पुणे मेट्रो लाईन ३ (हिंजवडी-शिवाजीनगर) मार्गांना आणि स्थानकांना केंद्र शासनाची मान्यता

Date:

पुणे-केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या १८ सप्टेंबर २०१८ च्या प्रसिद्ध
अधिसूचनेनुसार पीएमआरडीएच्या पुणे मेट्रो लाईन – ३ (हिंजवडी-शिवाजीनगर) च्या मार्गिका व स्थानकांना
मेट्रो अॅक्ट् १९७८ अनुसार केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या २३.३ किमी लांबीचा व २३ स्थानके असलेला मेट्रो प्रकल्प
नियोजन प्राधिकार्याच्या म्हणजेच एमआयडीसी, पीएमआरडीए, पीसीएमसी व पीएमसीच्या परिक्षेत्रातून
धावणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(पीएमआरडीए) ने हाती घेतलेला पुणे मेट्रो लाईन – ३ (
हिंजवडी ते शिवाजीनगर ) हा प्रकल्प राज्य शासनाने दि. १८ जुलै २०१८ रोजी ‘महत्वकांक्षी नागरी परिवहन’
(Vital important Urban Transport Project) प्रकल्प म्हणून घोषित केल्यानंतर केंद्र शासनाकडून मेट्रोच्या
मार्गिका व स्थानकांना मान्यता मिळाली आहे.
मेट्रोच्या स्टेशनसाठी माण, पीएमआर-२, पीएमआर-३, पीएमआर-४, पीएमआर-५, पीएमआर- ६, हिंजवडी,
पीएमआर- ८, वाकड चौक, , बालेवाडी स्टेडीअम, पीएमआर-११, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा,
बाणेरगाव, बाणेर, कृषी अनुसंधान, यशदा, सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय, आरबीआई, कृषी
महाविद्यालय शिवाजीनगर, सिविल न्यायालय या २३ ठिकाणच्या स्थानकांना व माण येथील कार डेपोस
मान्यता मिळाली आहे.
वरील मार्गीकेप्रमाणे पीएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच टाटा-सिमेन्स
कंपनीस सार्वजनिक भागीदारी तत्वावर अंतिम निविदाकार म्हणून निवड करण्यात आली आहे. लवकरच
पीएमआरडीए व तट सिमेन्स यांच्यामध्ये सवलत करारनाम्यावर स्वाक्षऱ्या होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात
होणार आहे, असे मा. आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...