पुणे-हवेली तालुक्यातील (Tissue Culture) ऊतक संवर्धन उत्पादन असलेल्या थेऊर येथील राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. कंपनीला लागलेल्या आगीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे
महापालिकेच्या (पीएमआरडीए) अग्निशमन केंद्रातील जवानांच्या सहकार्याने आठ तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
पीएमआरडीएच्या अग्निशमन जवानांनी इतर लॅबमध्ये आग पसरू नये म्हणून शर्तीचे प्रयत्न करून आग विझवल्याने जीवित व वित्त हानी टळता आली आहे. याच कंपनीतील दोन नंबरच्या लॅबमध्ये पाफिंग पॅनेल, एअरकंडीशन डग्स, काचेच्या बॉटल, झाकण व केबल्समुळे आगीचा भडका जास्त प्रमाणात उडाला. धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले होते.
आग विझविण्यासाठी पुणे महानगर, पुणे महापालिका व अॅमेनोरा टाऊनशीप दलाच्या वाहने पाचारण करण्यात आली होती. तर १८ जवान आग विझविण्यासाठी होते. दि.१४ सप्टेंबर शुक्रवारी सकाळी ८.३०
वाजता लागलेल्या आगीच्या घटनेत जवळपास १८ ते २० कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मात्र
अग्निशमन दलाच्या जवानांमुळे मोठी जीवित हानी टळली आहे.
पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अग्नीशमन दलाचे अधिकारी शिवाजी चव्हाण, पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, विजय महाजन, पुणे
पालिका व अॅमेनोराचे अग्निशमन अधिकारी तसेच स्थानिक कंपनीचे कर्मचारी यांचे आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.
पीएमआरडीएच्या अग्निशमन जवानांकडून आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात
Date:

