पुणे- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी व मारुंजी येथील
अग्निशमन केंद्रातील जवानांनी नांदेडगाव येथील लिंबानी कंपनी व वाघोली लोणीकंद येथील युनिक वेअर
हाऊस सर्व्हे नंबर ११ येथील बॅटरी सेलच्या साठवणूक वेअर हाऊसला लागलेली आग आटोक्यात आणली.
पीएमआरडीएच्या नांदेड सिटी व मारुंजी येथील अग्निशमन जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवल्याने
जीवित व वित्त हानी टळता आली आहे. आग विझविण्यासाठी दोन गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या तर
१५ जवान आग विझविण्यासाठी होते. किरकटवाडी येथील लागलेल्या आगीत ट्रान्सफार्मर जळून खाक झाला
आहे. तर वेअरहाऊस कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. दि. १० ला सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेत
जवळपास १० लाखांपेक्षा अधिक नुकसान सदर मालकाचे झाले असले तरी अग्निशमन दलाच्या जवानांमुळे
मोठी जीवित व वित्त हानी टळली आहे.
प्राधिकरण क्षेत्रात कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत अग्नीशमनदलाची मदत लागल्यास नागरिकांनी
दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधावा. नांदेड सिटी येथील अग्निशमन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 020-
६752000१ व 020-67520002 आहे. तर लाईफ रिपब्लिक सिटी अग्निशमन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक ०२०-
३८३०४०५०, ०२०-३८३०४०४० आहे. पीएमआरडीएच्या अग्निशमन सेवेमुळे होणारी वित्त व जीवित
हानी टळण्यास मदत झाली आहे, असे अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.
पीएमआरडीएच्या अग्निशमन जवानांकडून आग आटोक्यात
Date:

