पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीएच्या) वतीने तयार
करण्यात येणारा शिरूर तालुक्यातील चौफुला (करंदी फाटा) नगर रोड ते तळेगाव ढमढेरे रस्ता
शिक्रापूर दक्षिण बाजू बाह्यवळण ९ किमी रस्त्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.
शिक्रपूरची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव ढमढेरे- माळीमळा ते पिंपळे जगताप या
रिंगरोड रस्त्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामकाजाचा खर्च
१२ कोटी ८८ लाख इतका आहे. सध्य रस्त्याच्या कामकाजाची पाहणी पीएमआरडीएचे
अधीक्षक अभियंता रीनाज पठाण, कार्यकारी अभियंता एस.पी. कुंभार यांनी केली आहे.
पालकमंत्री गिरीश बापट व आमदार बाबुराव पाचर्णे, महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या
हस्ते कामकाजाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तळेगाव ढमढेरे येथील मालीमळा एल अँड टी
फाटामार्गे पिंपळे जगतापपर्यंत सुमारे ९ किमी लांबीचा हा रस्ता होणार आहे. या रस्ताची १०
मीटर इतकी रुंदी आहे. सणसवाडी ते शिक्रापूर रस्त्यावर औद्योगीकरण व नागरीकरण मोठ्या
प्रमाणावर झाल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. या ठिकाणी अनेक गृहप्रकल्प व
कंपन्या असल्यामुळे या रस्त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
पीएमआरडीएकडून तळेगाव ढमढेरे-माळीमळा-पिंपळे जगताप रस्त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात
Date:

