पुणे- लॉकडाऊन शिथिलतेनंतर काल ‘पीएमपीएमएल’ ने १ कोटी ५३ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. काल दि. १४ मार्च २०२२रोजी १५९० बसेस संचलनात होत्या. गर्दीच्या वेळेत व सध्या सुरु असलेल्या १० वी व १२ वी च्या परीक्षा विचारातघेवून परिवहन महामंडळाकडून मार्गावर संचलनात असलेल्या बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे.
लॉकडाऊन पूर्वी असलेली दैनंदिन प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्न मिळवण्यासाठी पीएमपीएमएल प्रयत्नशील
आहे. लॉकडाऊन पूर्वी दि. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पीएमपीएमएलला १ कोटी ५० लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले
होते. त्यानंतर जवळपास २ वर्षांनी दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पीएमपीएमएलने लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा १
कोटी ५० लाख २२ हजार ३२६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त करून दीड कोटी रुपये उत्पन्नाचा टप्पा पार केला होता.
यानंतर दि. १४ मार्च २०२२ रोजी १ कोटी ५३ लाखांचे उत्पन्न प्राप्त करून पीएमपीएमएलने दीड कोटीचे उत्पन्न
पार करण्याची ही दुसरी वेळ आहे. दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १५९० बसेसद्वारे जवळपास ९ लाख प्रवाशांनी
पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ घेतला.
लॉकडाऊन नंतर प्रवाशी पीएमपीएमएल बस प्रवासाला प्राधान्य देत असून यामुळे दैनंदिन प्रवाशी संख्येसह
दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊन पीएमपीएमएलची बससेवा पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊन नंतर पीएमपीएमएलची
दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून दैनंदिन उत्पन्नाच्या बाबतीत दीड कोटी रुपयांचा टप्पा
ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. सध्या पीएमपीएमएलच्या १५९० बसेस मार्गावर संचलनात आहेत. जास्तीत जास्त
प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
‘पीएमपीएमएल’ ने काल कमविले १ कोटी ५३ लाख;९ लाख प्रवाशांनी बससेवेला दिले प्राधान्य .
Date:

