पुणे: पीएमडीटीएच्या वार्षिक दिन साजरा करण्याच्या निमित्ताने पीएमडीटीए-अरुण वाकणकर मेमोरियल वार्षिक पुरस्कार पुण्यांतील आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ध्रुव सुनीश आणि १६ वर्षाखालील गटांतील विजेती व फेडकप खेळाडू सालसा आहेर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे करण्यात आले.
पीएमडीटीए-अरुण वाकणकर मेमोरियल वार्षिक पुरस्काराचे वितरण एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि अपर्णा वाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मंदार वाकणकर आणि पीएमडीटीएचे कौस्तुभ शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
मूळचा मुंबईचा असलेला ध्रुव सुनीश गेली ७ वर्ष पुण्यात राहत असून १० वर्षाखालील गटापासून अनेक स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळत गतवर्षी आयटीएफ गुणांसह केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे या स्पर्धेत प्रवेश केला आणि याचबरोबर सध्याचा १८ वर्षाखालील गटातील भारतातील दुसरा क्रमांकाचा खेळाडू असलेल्या ध्रुव सुनीशची बेंगळुरू येथील डेव्हिस कप स्पर्धेसाठी कुमार खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच, सालसा आहेर हिने दिल्ली येथील १६ वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले होते आणि कुमार फेड कप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ध्रुव सुनीश आणि सालसा आहेर या दोन्ही खेळाडूंना करंडक व प्रत्येकी ५ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
तसेच, याशिवाय जिल्ह्यांतील २०१६च्या यादीत विविध वयोगटात अव्वल क्रमांक पटकावलेल्या अर्णव पापरकर, आदिती लाखे, अर्जुन गोहड, राधिका महाजन, रोहन फुले, रिचा चौगुले, अथर्व शर्मा आणि शिवानी इंगळे यांचा याप्रसंगी अरुण वाकणकर मेमोरियल पदक आणि प्रत्येकी १५००रुपयांची शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याशिवाय केपीआयटी आणि एनएस स्पोर्ट्स अकादमी यांना पुण्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरविल्यामुळे विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वार्षिक पुरस्कार वितरण करणारी आणि खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरव करणारी पीएमडीटीए ही महाराष्ट्रातील टेनिस संघटनांपैकी एकमेव संघटना आहे.
जिल्ह्यांतील २०१६ ची खेळाडूंची वार्षिक मानांकन यादी खालीलप्रमाणे:
८ वर्षाखालील मिश्र गट: १. अर्णव पापरकर, २.रिशीता रेड्डी, ३.तेज ओक, ४.अहाना अट्टावर, ५.देवांश्री प्रभुदेसाई;
१० वर्षाखालील मुले: १.अर्णव पापरकर, २.रेथीन प्रणव, ३.आर्यन सुतार, ४.पार्थ देवरुखकर, ५.आर्यन शहा;
१० वर्षाखालील मुली: १. आदिती लाखे, २.सानिका भोगाडे, ३.इरा शहा, ४.आस्मि आडकर, ५.चिन्मयी बागवे;
१२ वर्षाखालील मुले: १. अर्जुन गोहड, २.अमन दहिया, ३.सिद्धार्थ मराठे, ४.दक्ष अगरवाल, ५.मानस धामणे;
१२ वर्षाखालील मुली: १.राधिका महाजन, २.मधुरिमा सावंत, ३.अन्या जेकब, ४.रिया भोसले, ५.गौतमी खैरे;
१४ वर्षाखालील मुले: १. रोहन फुले, २. गिरीश चौगुले, ३.आदित्य जावळे, ४.यशराज दळवी, ५.सर्वेश बिरमाने;
१४ वर्षाखालील मुली: १.रिचा चौगुले, २. ऋतुजा चाफळकर, ३.सिया देशमुख, ४.गार्गी पवार, ५.अग्रिमा तिवारी;
१६ वर्षाखालील मुले: १. अथर्व शर्मा, २.अथर्व निमा, ३.दिवेश गेहलोट, ४.कृष्णा मंत्री, ५. आदित्य निकम;
१६ वर्षाखालील मुली: १. शिवानी इंगळे, २. रिचा चौगुले, ३.अनया थोरात, ४.बेला ताम्हणकर, ५.नेहा मोकाशी.

