पुणे -महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोर ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, विधवा महिला यांना पेन्शन अजूनही सुरू न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने हा विषय लावून धरला अखेर महापौर मुक्त टिळक यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना स्थायी समिती समोर या बाबतचा सविस्तर प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले. पालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांचा यावेळी निषेध करण्यात आला.
पालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, प्रमोद नाना भानगिरे, बाळा ओसवाल, विशाल धनवडे, संगीता ठोसर, श्वेता चव्हाण, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, श्रीशेठ चव्हाण, नंदु माझे, संजय वाल्हेकर, राजेंद्र शिंदे, राजू सावंत, यशवंत शिर्के, संजय डोगरे, राजू विटकर, रुपेश पवार, मकरंद पेठकर, चंद्रकांत साठे, भाऊसाहेब कापडी, संतोष थोरात, राजेश परदेशी, सुरेश पवळे, संतोष भोसले, दिलीप महादे, शांताराम जावळे, पंकज जावळे, मुकुंद चव्हाण, शैलेंद्र मोझे आदी या आदोंलनात सहभागी झाले होते.
पुणे महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, अंध आणि अंपग व्यक्तीसाठी पेन्शन योजना सुरू केली. पण या योजनेसाठी बजेटमध्ये पुरेशी तरतूद नसल्यामुळे त्यांची अमंलबजावणी होत नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने या योजनेसाठी आर्थिक तरतूद लवकर उपलब्ध करून दयावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी अंध आणि अंपगांना पेन्शन देण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादीचे दिलीप बराटे, भाजपचे गोपाळ चिंतल यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर या पेन्शनसाठी कमी असणारी रक्कम देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समिती पुढे आणावा, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.