पुणे – महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत स्मार्ट संस्थेतील सेवकांना पुन्हा पालिकेच्या सेवेत घ्यावे या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी महापौर आणि उपमहापौरांच्या गाडीसमोर ठिय्या देऊन आंदोलन केले.
गेल्या 10 ते 12 वर्षापासून स्मार्ट संस्थेच्या माध्यमातून 230 संगणक ऑपरेटर पालिकेच्या विविध विभागात कार्यरत आहेत. मात्र जानेवारी 2017 पासून त्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मनसे नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह 50 ते 60 स्मार्ट संस्थेच्या सेविका उपस्थित होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन याबाबत उद्या महापौर कार्यालयात पदाधिकारी आणि अधिकाऱ्याची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.