पुणे-पुण्यात एकूण ३६ लाख वाहने आहेत . हि संख्या मोठी वाटेल पण हे सत्य आहे . या सर्व खाजगी वाहनचालकांची आणि मालकांची गळचेपी करून हाणून मारून त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वीकारायला भाग पाडणे किंवा नॉनमोटराईझ वाहन वापरण्यासाठी भाग पाडणे अशा उद्देशाने त्यांच्यावर अन्याय करणारा कारभार पुणे महापालिकेकडून होतो आहे .
पूर्वी तो बीआरटी च्या माध्यमातून झाला . पण आज बीआरटी च्या बट्ट्याबोळ झालेला आहे . सर्व बीआरटी मार्ग वारंवार उध्वस्त होत गेले .याच बीआरटी साठी खाजगी वाहनांसाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून बीआरटी ला स्वतंत्र हक्काचा रस्ता देण्यात आला . ज्यामुळे खाजगी वाहनांनी कोंडमारा सहन केला . त्यानंतर नॉनमोटराईझ वाहनम्हणून सायकली वापर असा संदेश देत जिथे पदपथ नाहीत , जिथे अगोदरच अरुंद रस्ते आहेत , जिथे दैनंदिन जिवनात सायकल हा पर्याय होऊ शकत नाही तिथे सायकलींसाठी सायकल मार्ग करून आहे त्या रस्त्यांवर आणखी आक्रमण करीत खाजगी वाहनाची आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला . खरे तर हे सारे प्रयत्न पूर्णतः अपयशी ठरले त्याला .. व्यवहारी दैनंदिन जिवनात दुचाकी वापरण्याशिवाय पुणेकरांना पर्याय च उरलेला नाही असे स्पष्ट कारण आहे . केवळ यामुळे ३४ लाख लोकसंख्येच्या शहरात २५ लाख दुचाक्या नोंदविल्या गेल्या आहेत तर 11 लाख चारचाकी नोंदविल्या गेल्या आहेत . घराघरात वाहन लागतेच असे नाही तर प्रत्येक प्रौढ व्यक्तीला वाहन लागतेच अशी स्थिती पुण्यावर काही वर्षांपूर्वीच लादली गेली आणि पुणेकरांनी ती जगण्यासाठी म्हणून पत्करली .
आता पुन्हा या सर्व खाजगी वाहनांची कोंडी करून त्यांच्याकडून भरमसाठ पैसा कसा काढता येईल यासाठी महापालिका राबायला तयार झाली आहे . पुन्हा ३५० कोटीचे सायकल मार्ग करून लोकांना सायकली वापर असा संदेश देणार आहे . भाड्याने सायकली उपलब्ध करून देणार आहे . पण आता गतिमान जिवनात वेळ महत्वाची आहे. पुणेकर बागेत जाताना ,व्यायामासाठी , सुटीच्या दिवशी सायकल वापरतील ही.. पण रोज ,आपली मोटार सायकल घरी ठेवून या सायकलींच्या जीवावर उदरनिर्वाहासाठी बाहेर पडू शकणार आहेत काय ? हा खरा प्रश्न आहे . किती पुणेकर आपल्या गाड्या घरी ठेवून सायकलींचा महापालिका देवू पाहत असलेला मार्ग पत्करतील या प्रश्नाचे उत्तर हवे आहे . ते जर नकारार्थी असेल तर हे ३५० कोटी कोणा कोणाच्या घशात जातील एवढे सुद्धा पाहण्याची आवश्यक्यता उरणार नाही .
एकीकडे अशा पद्धतीने सायकलींचे जाळे टाकणाऱ्या महापालिकेने दुसरीकडे खाजगी वाहनांना रस्त्यावर पार्किंग द्यायचे नाही , त्यांची कोंडी कशी करायची याचा आणखी एक उपाय शोधला आहे तो म्हणजे पे अँड पार्किंग ….
रस्त्यांवर पार्किंग साठी ३० रुपये प्रती तास असे शुल्क उभारण्याचा प्रस्ताव या महापलिकेत आला आहे . खरे तर औरंगजेबानेही एवढा आर्थिक अत्याचार केला नसेल .. असा मार्ग महापलिका का पत्करते आहे ? या प्रश्नाचे उत्तर सरळ सोपे असेच आहे . पीएमपीएमएल ची बस वापरावी म्हणून ३६ लाख वाहने ज्यांच्याकडे आहेत त्या पुणेकरांची अशा पद्धतीने गळचेपी करून त्यांना जबरदस्तीने पीएमपीएमएल च्या बस कडे वळविण्याचा हा प्रयत्न हि अयशस्वी ठरेल हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज भासणार नाही . कारण असे
पे अँड पार्किंग …. चे उपद्व्याप महापालिकावारंवार करीत आली आहे . आता त्याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे साहजिकच लोकंच्या तीव्र असंतोषाचा सामना पुण्यानेच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना करावा लागणार आहे . शहरातील रस्त्यांची अ , ब ,क ,ड अशी वर्गवारी करून अ वर्गवारीतील रस्त्यांवर दुचाकी पार्किंगसाठी प्रतितास ३० उपाये आणि ड वर्गवारीतील रस्त्य्नावर प्रतितास १० रुपये असे शुल्क आकारू पाहणारा प्रस्ताव महापलिकेत ठेवण्यात आला आहे . अर्थात यावर नेमके हि ३६ लाख वाहने वापरणाऱ्यांचे काय मत आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत .. अशाच प्रयत्नातून आम्ही आज कोथरूडला भेट दिली .. आणि तेथील वाहनचालकांच्या घेतलेल्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया येथे देत आहोत .. पहा या प्रतिक्रिया ….