पुणे- राज्य शासनाच्या आदेशानुसार आज (शुक्रवारी) मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महापालिकेमध्ये जुन्या पाचशे हजारांच्या नोटांच्याद्वारे मिळकत कराचा भरणा करण्याची मुभा देण्यात आली आहे सकाळी 8 ते रात्री10 या कालावधीत पुणे महापालिकेकडे 36:21 कोटींचा कर जमा झाला आहे. दरम्यान सुमारे दीडशे कोटीहून अधिक रक्कम महापालिकेला मिळकतकर धरकांकाकडून येणे आहे म्हणजे थकबाकी आहे जी वसुलीचे आव्हान देखील महापालिकेपुढे असताना , ५००- १००० च्या नोटा रद्द झाल्याचा निर्णय आणि त्याद्वारे मिळकत कर भरण्याची दिलेली मुभा यामुळे हे 36 कोटी बाहेर आले . अर्थात या सर्वांचा हा कला पैसा होता असा दावा कोणीच करू शकणार नाही . पण या निमित्ताने हे पैसे जमा झाले हे निश्चित . रात्री बारा वाजेपर्यंत मिळकत कर स्वीकारण्यात येणार आहे .
गर्दीची छायाचित्रे पहा