पुणे- महापालिकेतील सर्वोच्च अशा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या तत्कालीन महापौरांना आणि सध्याच्या माजी महापौरांनी आज ही आपल्या सन्मानासाठी सभागृहात पहिल्याच रांगेत बसवावे असा हत्त धरल्याचे चित्र आहे . सर्वाधिक प्रचंड बहुमताने भाजपा ने सत्ता काबीज केल्यानंतरही राष्ट्रवादी पक्षाकडून सभागृहात भाजपाला संख्याबळानुसार बसायला विरोध करीत ..मागे सारण्याचा प्रयत्न करून राजकारण केले जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे.९८ सभासद असलेल्या भाजपाला केवळ ४० सभासद असलेल्या राष्ट्रवादीने आमच्या माजी महापौरांना पहिल्या रांगेत बसवावे म्हणून वेठीला धरले असल्याचे चित्र आहे . वास्तविक पहाता एकदा महापौर या पदावर विराजमान झालेले मान्यवर आता पुन्हा नगरसेवक म्हणून सभागृहात आले आहेत.पण त्यांना आता निव्वळ नगरसेवक पदाचा मान नको तर त्याहून अधिक सन्मान मिळावा असे वाटत आहे . पहा याबाबत राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे यांनी काय म्हटले आहे .