पुणे- नगरसेवकांच्या वार्ड स्तरीय निधीतून नागरिकांना घरपोच धान्य मिळावे अशी आपण मागणी केल्यानंतर ,खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसेच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना निर्देश देवूनही याबाबत त्यांनी कार्यवाही केली नसल्याचा ठपका आज मनसे चे गटनेते वसंत मोरे यांनी ठेवला . या शिवाय महापालिकेतील खाते प्रमुख यांच्या ढिसाळ वृत्तीमुळे कोरोना ग्रास्तांची मृत्युनंतर हि हेळसांड होता असल्याचा ठपका त्यांनी ठेवला
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आज महापालिकेतील विरोधी पक्षांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी नेमके वसंत मोरे काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …

