‘त्या’महिलांनी गाजविली पालिकेची ‘उल्टापुल्टा’ सभा (व्हिडीओ)

Date:

पुणे- नेहमीच सभागृहात अत्यंत शांत राहणाऱ्या ‘त्या’ महिलांनी आज सभागृहात रोल बदलला .. चक्क सभागृह गाजवून सोडलं.. ..
सभेच्या वेळी इकडं तिकडं बघून कारभार : झापडं लावा यांना ‘ बैला सारखी … अशी नगरसचिव यांच्यावर तत्कालीन पक्षनेत्या शीतल उगले यांनी केलेली कोटी ,नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या: ‘आयुक्तां’च्या अँटीचेंबरवर त्यांच्या  विरोधात बोलणाऱ्या तथाकथित अधिकारी बनलेल्या आबा बागुलांची सभागृहातून उचलबांगडी होणे अशा प्रसंगांनी आज महापालिकेतील उल्टा पुल्टा सभा गाजली ..

 

बहुसंख्य पत्रकारांचा सहभाग , सभागृह नेते बनलेले नगरसचिव आणि पक्षनेत्या बनलेल्या दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांचा जोश पाहून महापौर बनलेले आयुक्त …. आणि आयुक्त बनलेल्या महापौरही
या विनोदी वातावरणात काही भाष्य करण्याचा मोह टाळू शकले नाहीत . सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची भूमिका जोरदार पणे वठवताना नगरसचिव  सुनील पारखी यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक बनलेल्या पत्रकारांनी तेवढ्याच जोरदारपणे  साथ दिली .  विरोधी आणि सत्ताधारी यांच्यातील सभागृहातील हालचाली दाखविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जोरदार हशाने दाद मिळाली  .तर नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणे, आयुक्तांचे न ऐकणे .. अशा अधिकाऱ्याची कशी उचलबांगडी होते ….ते आपल्या आयत्यावेळेच्या कृत्याने आबा बागुल यांनी दाखवून दिले . त्यातच’ त्यांनी ‘आयुक्त ‘ बनलेल्या महापौरांना तुम्ही सारख्याच अँटी चेंबर मध्ये असता असा टोला लगावून सभागृहात हशा पिकविला
अधिकारी बनलेले सभागृह नेते भिमाले , सुरक्षा अधिकारी बनलेले वसंत मोरे , नगरअभियंता बनलेले विरोधी पक्षनेते चेतन तुपे आदींनी आपापल्या भूमिका पार पाडल्या .. पण एकूणच बाजी मारली दोन महिला अतिरिक्त आयुक्त ज्या पक्ष नेत्या बनल्या होत्या त्यांनी .. आणि सभागृह नेता बनलेल्या नगरसचिव पारखी यांनी …. पहा एक झलक

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भगवान परशुरामांच्या पुण्यातील एकमेव मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ 

पुणे:ब्राह्मण महासंघ च्या वतीने  पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील शाहू चौकातील...

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी:डॉ. सचिन जोशी

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व्याख्यान पुणे :...

डिजिटल छळही आता लैंगिक छळ, विनयभंगाच्या श्रेणीत; विधेयक मंजूर:महिला सुरक्षेसाठी फडणवीस आक्रमक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६...

सोनिया दोन दिवसांपासून रुग्णालयात,राहुल रुग्णालयात रात्रभर सोफ्यावर झोपले

नवी दिल्ली- काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी गेल्या...