पुणे- भाजप नगरसेविकेच्या नातेवाईकाला आज महापालिकेच्या सभागृहात मतदान करून पे अँड पार्कचा ठेका देण्यात आला . विशेष म्हणजे जिथे हा पे -पार्क चा ठेका देण्यात आला ती जागा जिल्हाधिकाऱ्यांची असल्याचे नमूद करून हा ठराव भाजप सेनेने बहुमताने संमत केला .
भवानी पेठ ,पीएमसी कॉलनी नंबर १० येथे नागझरी नाला आहे . या नाल्यावर स्लॅब टाकण्यात आलेला आहे . सर्व नाले , ओढे , नदी पात्रे आणि लगतची काही जागा जिल्हाधिकारी यांची असते . भूमी जिंदगी विभागाचे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले कि ,या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी पार्किंगसाठी या जागेचा वापर करण्यास अनुमती दिली आहे.
मात्र हि जागा जिल्हाधिकाऱ्यांची आहे त्यावर महापालिकेने पे आणि पार्क चा धंदा कसा उभारावा ? केवळ पार्किंग साठी अनुमती दिलेली आहे , पार्किंग चा व्यवसाय तिथे करता येणार नाही असे आक्षेप कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी घेतले. तर अविनाश बागवे यांनी या ठरावाला विरोध करत , हा विषय न्यायालयात गेलेला आहे . न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी महापालिकेच्या प्राशासानाने ३० तारखे पर्यंत मुदत मागवून घेतली . आणि इकडे मात्र २७ तारखेलाच हा विषय मंजुरीचा घाट घातला जातो आहे. असा आरोप केला . शिवाय कोणत्याही महापालिका सभासदाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबध असतील तर असे ठराव घेता येत नाहीत , जाहिरात केली नाही ,एकच टेंडर आले ,अशा विविध आक्षेपांकडे बागवे यांनी लक्ष वेधले . तर सुभाष जगताप यांनी आंबील ओढा येथील क्रीडा संकुलाचे उदाहरण देत , जिल्हाधिकारी महापालिकेकडे भुर्दंड मागतील तर तो कोण देणार ? असा सवाल केला … तर भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी यावेळी या ठरावाचे समर्थन करताना सांगितले कि ,या जागेवर ड्रग्स, मुलींची छेडछाड असे गैरप्रकार चालत. म्हणून माझे नातेवाईक येथे वाहनतळाचा ठेका घेत आहेत ,ज्यामुळे येथील पार्किंग ची समस्याही सुटेल .
अखेरीस हा ठराव कॉंग्रेस राष्ट्रावादीचा विरोध झुगारून लावत भाजप सेनेने बहुमताने संमत केला .. पहा थेट .. व्हिडीओ