पुणे- जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पाणीकपातीबाबत चे दिलेले पत्र म्हणजे जलसंपदा विभाग आणि महापालिकेचे प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव आहे . अशी टीका करत अशी पाणी कपात आम्ही होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे तर महापौर मुक्ता टिळक यांनी पाणीकपातीबाबत च्या पत्रामुळे आपण शासनाशी पत्रव्यवहार करतो आहे असे सांगितले तर पुण्याच्या पाणीपुरवत्यात कोणतीही कपात होऊ देणार नाही , कोणालाही पाणी प्रश्न भेडसावणार नाही याची जबाबदारी आमची आहे असे प्रतिपादन महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे .
पहा हे महापालिकेतील पदाधिकारी पाणीकपाती बाबतच्या वृत्ताबाबत काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात ऐका ..पहा …