पुणे- पुण्यात ४० लाखाहून अधिक वृक्ष असतील अशी अपेक्षा आहे मात्र आजतागायत केवळ 17 लाख झाडांचाच सर्वे झाला आहे . आणखी 1 वर्षानंतर पुण्यात कोणती ,झाडे कुठे आणि किती याची सर्व माहिती वेबसाईट वरून नागरिकांना प्राप्त होईल अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज मुख्य सभेत दिली .
पुण्यातील विविध ठिकाणी झालेल्या वृक्षतोडीबाबत आज विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसच्या च्या नगरसेवकांनी मुख्य सभेत निदर्शने केली आणि प्रशासनाचा निषेध केला . विविध ठिकाणी प्रशासनाने असंख्य झाडांची कत्तल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला .
पुणे महापालिका परिसरात गेल्या आठ महिन्यात झाडे उन्मळून पडण्याच्या इतक्या घटना घडल्या आहेत की त्यामुळे भाजप सरकारने नव्याने आणलेला जीएसटी रेरा कायद्यामुळे झाडे आत्महत्या करत आहेत का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मुख्यसभेत उपस्थित केला.तुपे म्हणाले की मागील आठ महिन्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिल्डरांना अडसर होणारीच झाडे का उन्मळून पडत आहेत याची चौकशी होण्याची गरज आहे. भाजप नगरसेवक योगेश मुळीक यांनी देखील वडगाव शेरी येथे 59 झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती देत चुकीच्या पद्धतीने वृक्षतोडीला परवानगी देण्यात येत आहे. झाडे उन्मळून पडली असे सांगून विकासक बेकायदा झाडे तोडत असून अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला यावेळी सर्वपक्षीय सभासदांनी वृक्षतोडी बाबत आक्षेप नोंदवला.नगरसेवक सुभाष जगताप यांनी यावेळी पुणे वृक्ष लागवडीत ,जपनुकीत कसे उणे आहे ? हे पर्यावरण अहवालाचा दाखला देत सांगितले …. पहा हा व्हिडीओ या बाबत खुलासा करताना आयुक्त म्हणाले की, वृक्षतोडीच्या संदर्भतील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार असून यामुळे अर्जाची नेमकी संख्या समोर येणार आहे. तसेच बेकायदा वृक्ष तोड करण्यावर फौजदारी कारवाई करण्याची महापालिकेची तयारी असल्याचे त्यानीं सांगितले.