पुणे-एरवी नेहमी एकमेकांवर कुरघोड्या करणारे ,एकमेकांवर सडकून टीका करणारे, एकमेकांचे पाय खेचणारे,राजकारणाने पछाडलेले सर्व पक्षातील नगरसेवक,… या निमित्ताने एकत्र येवून ,एकत्र राहून थंड डोक्याने महापालिकेच्या कायद्यांचा ,अंदाजपत्रकाचा ,आणि सभाशास्त्राचा अभ्यास करणार आहेत . या निमित्ताने म्हणजे राजस्थानातील माऊंटाबू येथील सहलीच्या ..छे ,सहलीच्या नका म्हणू , अभ्यास दौऱ्या च्या निमित्ताने… म्हणा .
आता सगळ्याचा पक्षांचे नगरसेवक एकत्र असा अभ्यास करणार असतील तर त्यास हरकत कोणी घेवू नये .पण असा खरा प्लान तर महापलिकेत शिजतो आहे. महिला नगरसेविका असलेल्या एका समितीच्या अध्यक्षाने याबाबत महापौरांना आणि महापौरांनी सर्वांनाच या सहलीचे एकत्र आवत्न धाडलं आहे . आणि बहुतेक सारे तयार ही आहेत ,पण आता जायचं कसं? खर्चाचा भार पेलायचा कसा, याबाबत अजून तरी, कोणी काही बोलत नाहीये .पण तारीख तर ठरलेली दिसतेय . पत्रातच उल्लेख आहे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्मेंट नावाच्या संस्थेनं या अभ्यास शिबीराच आवतनपाठवलं आहे . याबाबत १० जून ला च त्यांनी पत्र धाडलं होतं.हे शिबीर ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी म्हणजे असे केवळ दोनच दिवस ठेवलं आहे . अनेक गोष्टींना पालिकेकडे पैसे नसले तरी , असे सारे ‘हम साथ साथ है ‘ म्हणून गोडीगुलाबीने पालिकेच्या कायद्याचा अभ्यास थंड डोक्याने करण्यासाठी माऊंटाबू ला जाणार असतील तर निश्चितच त्यांना पैसे उपलब्ध होतील यात शंका कोणी घेवू नये .