पुणे- आज वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन भाजपच्या शहरातील नेत्यांनी केल्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली असून
पालकमंत्री शिवसृष्टीचं झालं काय ? मेट्रो बाबत पंतप्रधानांवर भरवसा नाय काय ? असा सवाल केला आहे .
एकदा पंतप्रधानांनी मेट्रोचे गेल्या वर्षीच भूमिपूजन केल्यावर आज पुन्हा त्यातील वेगळ्या मार्गाचे भूमिपूजन करण्याचे प्रयोजन काय ? मेट्रोच्या एकूण सहा मार्गिका आहेत .पंतप्रधानांनी केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भूमिपूजन केले होते ,हेच आजच्या भूमिपुजानामुळे स्पष्ट झाले आहे असा आरोप हि त्यांनी केला आहे . नेमके तुपे पाटलांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात इथे ऐका ..पहा व्हिडीओ ….