पुणे -हडपसर रामटेकडी येथील कचरा डेपोला विरोध करता असताना आपल्याला पोलिसांकडून मावळ गोळीबाराची आठवण करून देत पोलीस धमकावत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून आज महापालिकेच्या मुख्य सभेत करण्यात आला .यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांशी बोलून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले .
हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने ७०० टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. याबाबत चेतन तुपे ,योगेश ससाणे, शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे व अन्य नगरसेवकांनी आंदोलने जाहीर केली होती , मात्र सोमवारी रात्रीच पोलिसांनी योगेश ससाणे यांच्याकडे चौकशी सुरू केली. काय करणार, कसे करणार, अशी विचारणा करीत आंदोलन करू नका असे त्यांना सांगण्यात आले.
आज मुख्यसभेला सुरूवात करताच ससाणे व हडपसरमधील अन्य नगरसेवकांनी महापौरांच्या समोर समोर येऊन आवाज उठविला .. हेमलता मगर, भैय्या जाधव, प्राची आल्हाट आदी नगरसेवकया वेळी येथे होते
योगेश ससाणे म्हणाले, ” आमचा विरोध लक्षात घ्या व तिथे प्रकल्प सुरू करणे रद्द करा. प्रकल्पापासून थोड्याच अंतरावर शाळा आहे. तेथील विद्यार्थी बरोबर घेऊन रेल्वे रूळांवर बसून आंदोलन करू” पोलिसांना कल्पना देऊन कायदेशीर आंदोलन केले तरीही पोलीस दडपशाही करीत असतील तर ती सहन केली जाणार नाही असा इशारा ससाणे यांनी दिला.
तर सुभाष जगताप यांनी हडपसर येथे कचरा डेपो साठी बेकायदेशीर कार्यवाही सुरु असल्याचा आरोप केला . आणि चेतन तुपे पाटील यांनी कोथरूडकरांना दिला तो न्याय हडपसर वासियांना हि द्या अशी मागणी केली .
दरम्यान आज मुख्य सभेत पुणे महापालिका हददीत नव्याने समाविष्ट झालेल्या येवलेवाडी गावच्या विकास आराखडयास ( डीपी ) आज ,मुख्यसभेच्या बैठकीत विरोधकांच्या मागण्या धुडकारून लावत मंजुरी देण्यात आली.
शहराच्या जुन्या हद्दीचा आणि 23 गावांचा डीपी तयार करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे महापालिकाहद्दीत येवलेवाडी या गावाचा समावेश झाला. त्यामुळे या गावाचा स्वतंत्र डीपी पालिका प्रशासनाने तयार केला. हा डीपी शहर सुधारणा समितीकडे मान्यतेसाठी पाठविला होता . या डीपीवर शहर सुधारणा समितीमध्ये सातत्याने चर्चा झाली. अखेर या डीपीला काही दिवसापूर्वी उपसूचना देऊन एकमताने मंजुरी देण्यात आली. या नंतर आज तो मुख्यसभेपुढे ठेवण्यात आला होता
(मुख्य सभा लाइव्ह व्हिडीओ https://www.facebook.com/MyMarathiNews/ या पेजवर पाहावेत )