पुणे -९०० सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या वार्षिक १५ कोटीचे टेंडर मिळविण्यासाठी बाराणेचे टेंडर आठ आण्यात भरणारे तथाकथित महाभाग ,प्रत्यक्षात टेंडर मिळविल्यानंतर काय आणि कसे दिवे पाजळतील ? असा सवाल करीत नगरसेवक अविनाश बागवे यांनी या प्रकरणी महापालिका अतितिरिक्त आयुक्तांचे लक्ष वेधले आहे . महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयात तसेच उद्याने ,सांस्कृतिक भवन ,स्मशान भूमी,दवाखाने,जलतरण तलाव,समाज मंदिरे ,प्राणी संग्रहालये,पाणीपुरवठा केंद्रे ,स्टेडीअम,महापालिकेच्या जागा ,मिळकती ,जल केंद्रे,आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक- मदतनीस पुरविण्यासाठी महापालिकेने टेंडर मागविली होती . यामध्ये किमान वेतन कायद्यानुसार वेतन , भविष्य निर्वाह निधी , संपर्क तसेच दळणवळण खर्च,टीडीएस.. आदी सर्व बाबींचा विचार होणे अपरिहार्य आहे . मात्र याबाबत कोणताही विचार न करता केवळ स्वस्तात , सर्वात कमी दराने आलेले टेंडर म्हणून एका महाभागाचे टेंडर मंजूर करण्याचा घाट प्रश्नातील काही अधिकाऱ्यांनी घातला आहे . याबाबत पुढील विचार होणे गरजेचे असून बारा आणे खर्चाचे काम कोणी आठ आणे खर्चात कसे आणि का करायला तयार होतो ? याचा विचार करूनच प्रशासनाने याप्रकरणी स्थायी समिती पुढे विषयपत्र ठेवायला हवे होते . मात्र तसे न करता सर्वात कमी दराचे टेंडर म्हणून संबधित महाभागाची शिफारस केली आहे . हा पराक्र धोकादायक असून महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेशी असा खेळ होऊ नये . याबाबत योग्य ती दक्षता हि घेतलीच पाहिजे अशी भूमिका बागवे यांनी घेतली आहे . पहा आणि ऐका नेमके याप्रकरणी बागवे यांनी काय म्हटले आहे …