पहा तर …मानवी शरीर 10 सेकंदात निर्जंतुक -नागरिकांसाठी मिस्ट सॅनिटायझर कक्ष नायडू हॉस्पिटल मध्ये सुरु -(व्हिडीओ)

Date:

पुणे- करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक आगळावेगळा मिस्ट सॅनिटायझर कक्ष सुरू केला आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात येत आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील मिस्ट रेझोनन्स इंजिनिअरिंग या कंपनीने मिस्ट सॅनिटायझर देणगी स्वरुपात दिला आहे.

हा नाविन्यपूर्ण निर्जंतुकीकरण कक्ष नायडू हॉस्पिटल येथील करोना उपचार केंद्रात कार्यान्वित करण्यात आला आहे.

याची खासियत म्हणजे या उपकरणांमध्ये स्वयंचलित सेन्सर आहे. व्यक्ती या कक्षामध्ये प्रवेश करताच सेन्सर आपोआप कार्यान्वित होऊन द्रव रुपात सोडियम हायपोक्लोराईड द्रावण फवारले जाते. हे द्रावण मानवी शरीरासाठी सुरक्षित असून ती व्यक्ती आत प्रवेश करताच 10 सेकंदात निर्जंतुक होते. कक्षात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने कक्षाबाहेर ठेवण्यात आलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. या दरम्यान सेन्सर कार्यान्वयित होतात.

या उपकरणामुळे हॉस्पिटलमध्ये आत बाहेर करावे लागणाऱ्या सर्व व्यक्ती उदाहरणार्थ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण होणार आहे.

या सॅनिटायझर कक्षामुळे सर्वांना निर्जंतुक करून करोनाला दूर ठेवण्यात मोठी मदत होणार आहे. यासाठीच पुणे महानगरपालिकेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

मदतीचे आवाहनास प्रतिसाद–
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंद्धात्मक उपाययोजने अंतर्गत पुणे महापालिकेच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत,
अलीकडे नुकतेच महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मदतीकरिता केलेल्या आवाहनास अनुसरून नागरिक,विविध संस्था, कंपन्या,उद्योजक अशा स्तरावरून मनपा करिता वैद्यकीय सुविधा व अन्न, औषधे,वैद्यकीय साधनसामुग्री करिता मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला आहे,
मार्च अखेर ते आजतागायत प्राप्त झालेली मदत खालील प्रमाणे—
पुणे अर्बन सहकारी बँक-रुपये 1,लाख,
मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना–रुपये,5 लाख,
नितीन देशपांडे,जितेंद्र सावंत,dyneshwar घाटे,प्रमोद पाटील,संदीप कोल्हटकर यांचे उपस्थितीत मा,महापालिका आयुक शेखर गायकवाड यांनी धनादेश स्वीकारला,
अमृतराव जयसिंगराव खिलारे,–रुपये 25000/-
श्री,गुरुदत्त मंडळ,एरंडवना,
आनंद मुरलीधर घैसास,नागेश पुरुषोत्तम करपे,
रुपये-1लाख,
महादेव मंदिर ट्रस्ट,सी एम जगताप,कोथरूड
रुपये–25000/-
सिंबायोसिस विद्यापीठ,लवले यांचेकडून मनपा करिता कोरोना रुग्णाणकरिता अर्थात विलगिकरणाकरिता 500 बेड व अतिदक्षता विभागाकरिता 30 बेड उपलब्ध करून देण्यात आलयाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले,
सी एस आर अंतर्गत–
आय सी इ आर ती आय येस सोल्युशन प्रा,लि, यांचे वतीने
व्ही ती एम किट–600,
PPE kit- 546,
N-95, मास्क –5000,
Disposeble मास्क–5000,
कापडी मास्क-100,
पाषाण येथील DRDO यांचेकडून-
300 लिटर सोडियम हायपोक्लोराईत,
300,लिटर हँड sanitiser,
प्रिन्सिपॉल कंपनीच्या वतीने
3 लेयर मास्क–50000,
नितीन देशपांडे–यांचेकडून 50,नेबुलाईझर,
संदीप महाजन यांचेकडून 10 vheelchair,
कमिन्स इंडिया फौंडेशन यांचे वतीने–कापडी मास्क–10000
हँड sanitiser-425 bottles,
Kiyon india prv ltd,यांचेकडून
PPE Kit- 450,
Hand sanityser-190,bottles,
DRDO यांचेकडून
400 लिटर,सोडियम हायपोक्लोराईत,
150,ltr हॅन्ड sanitiser,
विजय कुलकर्णी यांचेकडून electrik सक्शन मशीन -15,
रवी पाटे व नंदू घाटगे यांचेकडून,
फिंगर पल्स ओकझोंमिटर–10,
लॅरिन गोस्कोप लेड–10,
इसीजी मशीन–2,
डॉ,नायडू संसर्गिर्क रुग्णालयात काल मिस्ट sanityser कक्ष मकरंद चितळे यांनी नागरिक,रुग्ण,डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी यांचे निर्जंतुकीकरिता डॉ,नायडू रुग्णालय प्रवेशद्वार येथे बसविण्यात आला,

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेश बिडकरांच्या महा ई-सेवा केंद्रातून तब्बल २७ हजार लोकांनी घेतला लाभ

पुणे : शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही स्वतंत्र लढू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान

मुंबई-"पुण्यात जर दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार...

ठाकरे बंधू एकत्र येताच भाजपने रणनीती बदलली:शिंदे गटासाठी जागांची संख्या वाढवली, तरीही नाराजी

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि...