सुभाष जगताप आणि श्रीनाथ भिमाले यांच्यात पुन्हा धुमशान (व्हिडीओ)

Date:

पुणे-मराठी चित्रपट ‘जाऊ तिथे खाऊ ‘यातील कथेप्रमाणे महापालिकेचा कारभार झाला असून विशेष म्हणजे याबाबत  सत्ताधारी मात्र लाज लज्जा सोडल्यासारखे वागतात असे मला वाटते असे विधान आज सभागृहात राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी करताच क्षणभर शांतता पसरली अन दुसऱ्या क्षणी माजी सभागृह नेते चवताळून उठले ,’याला लाज लज्जा आहे काय , काहीही बोलतो … अशा एकेरी शब्दात त्यांनी जगताप यांना सुनावण्याचा प्रयत्न केला . सुशील मेंगडे यांनी यावेळी भिमाले यांना साथ दिली .अनेकांनी जगताप यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण भिमाले संतापलेले च होते अखेरीस महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या आध्कारात सगळ्यांना खाली बसण्याचे आदेश देत यावर पडदा पाडला .

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील खास सभेत हा प्रकार घडला .

वापरलेल्या शब्दावरून सुभाष जगताप यांनी माफी मागावी, त्याशिवाय भाषण करू नये, अशी मागणी श्रीनाथ भिमाले यांनी केली, त्यांना खाली बसण्याची वारंवार विनंती महापौर मुरलीधर मोहोळ करीत होते, मात्र, भिमाले काही खाली बसायला तयार नव्हते, भाजपचे नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे यांनीही सुभाष जगताप यांच्यावर टीका केली.

माजी महापौर प्रशांत जगताप यांनीही वारंवार भाजप नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सभागृह नेते धीरज घाटे यांनी सुभाष जगताप यांच्यावर टीका केली. आपले वक्तव्य  मुर्खपणाचे असल्याचे एखादा नगरसेवक म्हणाला तर चालेल  का?, असे विचारले 

सुभाष जगताप म्हणाले, घोषणांचा पाऊस पडणारे हे अंदाजपत्रक आहे. एवढी टीका यापूर्वी कधीही बजेटवर झाली नव्हती. धोरणात्मक निर्णय अंमलबजावणी केली तर 10 हजार कोटी रुपयांपर्यंत बजेटमध्ये वाढ होणार, हॉकर्स झोन पॉलिसी, होल्डिंग पॉलिसी, मुख्य सभेने मान्य करूनही अंमलबजावणी का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सत्ताधारी आता जाऊ तिथे खाऊ ब्रीदवाक्य झालंय, नाले सफाई, रस्ते, फुटपाथ, केवळ कागदोपत्री आहेत, महापालिकेची सर्व कामे चोरीला गेली आहेत. त्यासाठी ‘जाऊ तिथे खाऊ’ चित्रपटातील चोरीला गेलेल्या विहिरीचे उदाहरण देण्यात आले. हे अंदाजपत्रक गोरगरीब नव्हे तर धनधांडगे, ठेकेदारांसाठी आहे.

सध्या जगभरात प्रचंड मंदी आहे. हे अंदाजपत्रक फसवं आहे, सत्तेचा वापर जनतेला दिलासा करण्यात यावा, भ्रष्टाचार, बेकायदेशीर कारभार करण्यासाठी सत्तेचा वापर करण्यात येऊ नये, हे अंदाजपत्रक 57 टक्क्यांनी फुगविण्यात आले आहे.

महापालिकेत शिमगा असताना दिवाळी असल्याचे दाखवताय, आबा बागुल यांचे कोट्यवधी रुपये किमतीचे प्रकल्प सुरू आहेत, पण एकही प्रकल्प सुरू नाही, भामा-आसखेड प्रकल्प सुरू भाजपमुळे सुरू झाला नाही. श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभागातील उड्डाणपूल सोडता एकही प्रभाग पूर्ण झाला नाही, शंकर महाराज परिसरात 2 कोटी रुपये तरतूद केली, पण जागाच नसल्याने कामच होणार नाही, असाही आरोप त्यांनी केला

(हा संपूर्ण प्रकार  फेसबुक वरील मायमराठी च्या पेज वर लाईव्ह करण्यात आलेला आहे . तिथे जसाच्या तसा पाहता येईल )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...