पुणे-शहराच्या मध्यवस्तीत भागातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने मध्यम आकाराच्या 32 आसनी क्षमतेच्या मिडी बस भाडेतत्त्वावर घेण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंजपेठ मार्गे) या मार्गसह स्वारगेट-टिळक रस्ता- खजिना विहीर- अप्पा बळवंत चौक, पुणे स्टेशन मार्ग पूलगेट हा वर्तुळाकार मार्ग या गाड्यांसाठी प्रस्तावित केला आहे. या मार्गावर तिकिटाचे शुल्क दिवसभरासाठी दहा रुपये असणार आहे, असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.
या रूट वर पीएमपी बसमधुन फिरा दिवसभर 10 रूपयात ,पहा कोणते आहेत मार्ग…
Date:

