पुणे महापालिकेचे 7 हजार 390 कोटींचे अंदाजपत्रक सादर

Date:

आज महापालिकेच्या स्थायी समिति ने मुख्य सभेला 20-21 चा अर्थसंकल्प सादर केला.
दृष्टिक्षेपात अंदाजपत्रक सन २०२०-२०२१

प्रभावी महसूल वाढ

  • गेल्या दहा वर्षांतील अंदाजपत्रकाचा आढावा घेतल्यानंतर अपेक्षित उत्पन्न आणि प्रत्यक्षातील उत्पन्न यात मोठी तङ्गावत दिसून येते. त्यासाठी अंदाजपत्रकातील अपेक्षित उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याचे नियोजन आहे.
  • महसूल वाढीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
  • मिळकतकरातील गळती थांबविणे आणि सुमारे ४२०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी अभ्यासपूर्ण योजना आखून अंमलबजावणी करणे
  • शहरातील आणि समाविष्ट ३४ गावांतील ६ मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरायला परवानगी नाही. स्थायी समितीच्या अखत्यारित २१० आखणी करून ते रस्ते रूंद करणार आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देऊन निधी उभा करणे
  • बांधकाम परवाना प्रकि‘येतील शुल्काची रक्कम एकत्रित न आकारता तीन टप्प्यात शुल्क आकारणी करून बांधकाम प्रकल्पांना गती देणार
  • मालमत्ता व्यवस्थापन विभागाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेत धोरण आणून त्या अनुषंगाने उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार
  • शहरात किमान २०० ठिकाणी पादचारी उन्नत मार्ग (गँड्री) विकसित करून (लिफ्ट किंवा सरकते जिने) आकाशचिन्ह विभागाच्या माध्यमातून जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार
  • शहरातील महापालिकेची उद्याने, उड्डाण पूल, नदीवरील पूलावर जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार
  • महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिका आणि अन्य वास्तूंकडून भाड्याच्या रकमेची प्रभावी वसुली करणार
  • मोबाईल कंपन्यांच्या थकबाकीची प्रभावी वसुली
  •  महसूल संदर्भातील न्यायप्रविष्ट दाव्यांवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची लवाद म्हणून नियुक्ती करून दावे लवकरात लवकर निकाली काढून थकित महसूलची प्रभावी वसुली करणार


गतिमान वाहतूक
रिंग रोड, नवे रस्ते

‘एक रस्ता  एक एकक (युनिक)’
‘एक रस्ता – एक एकक‘ या धोरणानुसार या पुढील काळात रस्ता आणि विविध सेवा वाहिन्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार रस्ता, रस्त्याचे डांबरीकरण किंवा कॉंकि‘टीकरण, कामाची गुणवत्ता, पदपथ, चौक, सिग्नल व्यवस्था व सिंक्रोनायझेशन, गतिरोधक, झेब्रा क्रोसिंग, रम्बलर्स स्ट्रिप, रस्त्यातील खड्डे, वाहनतळ व्यवस्था, बेवारस वाहने, अतिक्रमणे, अपघात होणार्‍या शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ वर उपाययोजना, पावसाळी कोंडीचे चौकातील उपाययोजना, ड्रेनेज, पावसाळी गटारे, वीजवाहिन्या, ऑप्टिकल फायबर केबल आणि एमएनजीएलच्या वाहिन्यांचे नियोजन, अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स आदी सर्व विकासकामांचा एकत्रित विचार करण्यात येणार आहे. या विषयाची जबाबदारी क्षेत्रिय कार्यालयानुसार एका अधिकार्‍यावर निश्‍चित करण्यात येणार आहे. 


लालमहाल चौक ते फडगेट पोलीस चौकी  ग्रेडसेपरेटर
शिवाजी रस्त्यावरील लालमहाल चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होते. गर्दीच्या वेळांत या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने लालमहाल चौक ते  
 फडगेट   पोलीस चौकी  ग्रेड येथे सेपरेटर प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

बंडगार्डन जंक्शन ते मुंढवा पूल डीपी रस्ता 
पुणे-नगर रस्ता व नॉर्थ मेन रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बंडगार्डन जंक्शन ते मुंढवा पूलापर्यंत सुमारे ३ किलोमीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. नदीकाठच्या या रस्त्याच्या निर्मितीला मोठा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पी. पी. पी. किंवा क्रेडिट नोटमाध्यमातून हा रस्ता विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी एफएसआय, टीडीआर आणि 
 क्रेडिट    बॉंड या पर्यायांचा वापर करण्यात येणार आहे. याच धर्तीवर शहरातील २१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे.

साधु वासवानी पूल ते बंडगार्डन पूल पुननिर्मिती 
साधु वासवानी पूल (कोरेगाव पार्क उड्डाण पूल) ते बंडगार्डन पूल या मध्यवर्ती भागातील या पुलावरुन येणारी वाहने ही लष्कर, पुणे शहर, कोरेगाव पार्क आणि नगर रस्ता महामार्गाकडे मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. साधु वासवानी पूल ९ मीटर रुंदीचा असून तो वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. हा पूल कमकुवत झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. तो नव्याने उभारण्याचे नियोजन आहे.

उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरण 
पुणे शहरात १८ उड्डाण पूल अस्तित्वात असून काही नवीन उड्डाण पूल उभारण्याची कामे सुरू आहेत. अस्तित्वात असलेल्या उड्डाण पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात अतिक्रमन आणि अनधिकृतपणे पार्किंग होत आहे. या समस्येवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उड्डाण पुलाखालील जागा बंदिस्त करून त्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सुशोभिकरणासाठी झाडे लावणे. या आर्थिक वर्षात दहा उड्डाण पुलांखाली उपलब्ध असणार्‍या जागेवर सुशोभिकरण करण्याचे नियोजन आहे.

मेट्रो डीपीआर
पुढील पन्नास वर्षांचा वेध घेत पुणे शहर, जिल्हा आणि सभोवतालची औद्योगिक केंद्राला एकत्र जोडण्यासाठी मेट्रोचे विस्तृत जाळे निर्माण करण्याची गरज आहे. पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतुक आराखड्यामध्ये पुणे शहराच्या हद्दीतून जाणार्‍या सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट (९ किमी), वारजे ते स्वारगेट (११ किमी), रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक (१० किमी), स्वारगेट ते कात्रज (६ किमी) आणि शिवाजीनगर ते हडपसर (१२ किमी) या मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहेत. या मार्गिकांचा महामेट्रोच्या माध्यमातून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे शहराच्या चारही बाजूंना प्रत्येकी ५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका विस्तारीत करण्यात येणार आहे. शहराच्या हद्दीतील मार्गिकेच्या डीपीआरसाठी महापालिका आणि शहराच्या हद्दीबाहेर पीएमआरडीए निधी उपलब्ध करून देणार आहे.

बीआरटीएस प्रकल्प

  • नगर रस्त्यावरील १६ किलोमीटर लांबीची बी. आर. टी. एस. योजना कार्यान्वित झाली आहे.
  • सिमला ऑफिस चौक ते राजीव गांधी पूल, औंध दरम्यान साडेसहा किलोमीटर लांबीच्या प्रस्तावापैकी विद्यापीठ चौक ते औंध अशा ३.२ किलोमीटर लांबीचे रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
  • पाटील इस्टेट जंक्शन ते हॅरिस ब्रीज, बोपोडी या ५.७० किलोमीटर रस्त्यापैकी पाटील इस्टेट ते रेंजहिल चौक या २ किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
  • रेंजहिल चौक ते खडकी रेल्वे स्टेशन या २.२ किलोमीटर लांबीच्या काम प्रस्तावित आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारितील जागेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या परवानगीची प्रकि‘या सुरू आहे.
  • स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या ५.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम थोड्याच कालावधीमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
  • गणेशखिंड रस्ता, पुणे-मुंबई रस्ता आणि पाटील इस्टेट ते संगमवाडी या मार्गावर १५ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित आहे.
एचसीएमटीआर प्रकल्प
पुणे शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी १९८७ मध्ये पुणे शहराच्या विकास आराखड्यात पहिल्यांदा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रस्तावित करण्यात आला होता. सर्व उपनगरे, सर्वाधिक वाहतूक असलेले शहरातील ६० छोटे-मोठे रस्ते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा प्रस्तावित मार्ग ३६ किलोमीटर रुंदीचा आणि २४ मीटर रुंदीचा आहे. दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा मार्गिका असणार आहेत. या मार्गावर बीआरटीसाठी दोन स्वतंत्र मार्गिका असून, उर्वरित चार मार्गिका खासगी वाहनांसाठी खुल्या ठेवल्या जाणार आहेत. या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर 
शहराच्या विविध भागातील वाहतुकीच्या कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी उड्डाण पूल ग्रेडसेपरेटर उभारण्याचे प्रकल्प आणि त्यासाठी केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे

  • सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौक उड्डाण पूल बांधणे ः रुपये १० कोटी
  • मुंढवा येथे मुळा-मुठा नदीवर जुन्या पुलाची दुरुस्ती करणे ः रुपये ३ कोटी
  • घोरपडी येथे पुणे सोलापूर आणि पुणे-मिरज रेल्वे लाईनवर उड्डाण पूल बांधणे ः रुपये २० कोटी
  • वखार महामंडळ चौक येथे उड्डाण पूल बांधणे ः रुपये १० कोटी
  • नळस्टॉप चौकात उड्डाण पूल बांधणे ः रुपये २० कोटी
  • औंध वाकड/सांगवी रस्त्यावरील अस्तित्वातील पुलाशेजारी नवीन पूल बांधणे ः रुपये १४ कोटी
  • गोल्ङ्ग चौक येरवडा येथे ग्रेड सेपरेटर किंवा सबवे बांधणे ः रुपये १७ कोटी
  • विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत संयुक्तपणे उड्डाण पूल उभारणे ः रुपये २० कोटी
  • मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाषाण-सूस येथे उड्डाण पूल उभारणे ः रुपये २० कोटी
  • सिंहगड रस्ता येथे नवीन उड्डाणपूल बांधणे ः २० कोटी रुपये
  • खराडी बायपास चौक येथे उड्डाण पूल/ ग्रेड   सेपरेटर बांधणे ः रुपये २० कोटी
  • बोपोडी चौक, पुणे-मुंबई रस्ता येथे वाहन भुयारी मार्ग आणि पादचारी मार्ग बांधणे ः रुपये ५० लाख
  • राजाराम पूल येथे पेडेस्ट्रियन प्लाझा विकसित करून सुशोभिकरण करणे ः रुपये २ कोटी ५० लाख
  • सनसिटी, सिंहगड रस्ता ते कर्वे नगर नदीवर पूल उभारणे ः रुपये ५० लाख
  • बालेवाडीजवळ मुठा नदीवर पूल बांधणे ः रुपये ७ कोटी
  • जुन्या पुलांची दुरुस्ती करणे ः रुपये १० कोटी
  • राष्ट्रीय राजमार्ग क‘मांक ४ वरील चांदणी चौकातील विकसन ः रुपये ७ कोटी
  • पुणे शहरातील विविध पुलांना संरक्षक जाळी बसविणे आणि अनुषंगिक विकासकामे ः रुपये २ कोटी
  • पुणे-सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर येथे उड्डाण पूल उभारणे

वाहतूक जनजागृती अभियान ः
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या घटनांमुळे झालेल्या अपघात शहरात दररोज किमान एका व्यक्तीचा मृत्यू होतो ही सद्यःस्थिती आहे. अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिंना अपंगत्वाचे आयुष्य जगावे लागते. पुणे महानगरपालिका आणि सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’तील विद्यार्थी ‘वाहतूक जनजागृती अभियान’ राबविणार आहेत.
खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक ः
आरोग्य आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना’ सुरू केली. नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फुर्तीने सायकलींचा वापर करावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा भाग म्हणून खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना सायकल खरेदी करण्यासाठी विनाव्याज सुलभ हप्त्याने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
वाहनतळ ः
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या हद्दीमध्ये वाहतुकीची कोंडी आणि वाहनतळाची समस्या आहे. विकास आराखड्यामध्ये वाहनतळासाठी राखीव असलेल्या आणि नजिकच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात येऊ शकणार्‍या विविध जागांवर वाहनतळ विकसित करण्यात येणार आहेत.
ट्रॅफिक पार्क ः
पुणेकर नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी या उद्देशाने ब्रेमेन चौक परिसरात वाहतूक विषयक माहिती देणारा  ट्रॅफिक  पार्क उभारण्यात येणार आहे. या परिसरातील ११ शाळांतील पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. अशाच प्रकारचा ट्रॅङ्गिक पार्क या वर्षी येरवड्यात प्रस्तावित आहे.

महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तरतुदी
शिवणे-खराडी रस्ता ः
पूर्व आणि पश्‍चिम उपनगराला जोडणार्‍या शिवणे ते खराडी या १८ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. शिवणे ते म्हात्रे पूल या टप्प्यातील ६ किलोमीटर आणि संगमवाडी ते खराडी या टप्प्यातील ११ किलोमीटर ५०० मीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता ः
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे भूसंपादनासह रस्तानिर्मिती सर्व कामे केली जाणार आहेत. कात्रज चौकातील राजस सोसायटी ते कोंढवा-खडी मशीन चौकापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर लांबीचा आणि ८४ मीटर रूंदीचा रस्ता विकसित करण्यात येत आहे.

बालभारती-पौड फाटा रस्ता ः 
विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी विकास आराखड्यात दोन किलोमीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा बालभारती-पौड ङ्गाटा रस्ता दर्शविण्यात आला आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होणार आणि या वाहतूक परिणाम अहवाल तयार करण्यात आले आहेत. सल्लागाराच्या सादरीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर विकसनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सक्षम सार्वजनिक वाहतूक
मिडी बसचा प्रवास दिवसभरासाठी १० रुपयात ः
मध्य पुण्यातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. अशा भागात पीएमपीच्या मध्यम आकाराच्या (मीडियम-मिडी) गाड्या भाडेतत्त्वावर आणल्या जातील. या गाड्यांची आसन क्षमता ३२ असेल. डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंज पेठ मार्गे) या मार्गांसह स्वारगेट-टिळक रस्ता-खजिना विहिर-आप्पा बळवंत चौक-पुणे स्टेशन मार्गे पूलगेट हा वर्तुळाकार मार्ग या गाड्यांसाठी प्रस्तावित आहे. या चार ही मार्गांवर तिकिटाचे शुल्क दिवसभरासाठी दहा रुपये राहणार आहे.
बसेस खरेदी ः
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात १४५९ स्वमालकीच्या बस आहेत. ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट‘च्या निकषानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकत्रित लोकसं‘येचा विचार करता पीएमपीएमएलच्या ताफ्यात किमान ३ हजार बस असणे आवश्यक आहे. त्यानुसार भाडेतत्त्वावरील ४९२ बस, ७०० ई-बस आणि ४४० सीएनजी बसचा समावेश करुन ताफ्यात समावेश करण्याचे नियोजन केल्यान ३०४१या वर्षी करण्यात आले आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या ताफ्यात ३०४१ बस राहणार आहे. या वर्षीच्या अंदाजपत्रकात ३०० ई-बसेसची खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

समान, शुद्ध पाणीपुरवठा
समान पाणीपुरवठा योजना ः
समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पुणे शहरात ८२ साठवण टाक्या बांधणे, १८०० किलोमीटरची जलवाहिनी टाकणे आणि ३ लाख १५ हजार जलमापक (मीटर) बसविण्याची विकासकामे अंतर्भूत आहेत. मार्च २०२० पर्यंत ५० टाक्यांची उभारणी, ३०० कि. मी. लांबीच्या जलवाहिन्या टाकणे आणि ४० हजार मीटर बसविण्याची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. या योजनेमुळे पुणेकरांना २४ तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा करता येणे शक्य होणार आहे.
भामा आसखेड ः
पुणे-नगर रस्त्यावरील लोहगाव, कळस, विश्रांतवाडी, संगमवाडी, येरवडा, धानोरी, वडगावशेरी, कल्याणीनगर, खराडी, चंदननगर या भागातील नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी भामा-आसखेड प्रकल्पातून २.६२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात १८५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून दीड किलोमीटरची जलवाहिनी टाकणे, जॅकवेलची कामे आणि पाणी उचलण्यासाठी खोदाई अशी कामे पूर्ण करायची आहेत. या प्रकल्पातून या वर्षी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
लष्कर जलकेंद्र पुनर्विकास ः
लष्करसह शहराच्या पूर्व भागातील हडपसर आणि काही मध्यवर्ती पेठांना लष्कर जलकेंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. हे जलकेंद्र सव्वाशे वर्षे जुने आहे. या केंद्रातील साठवण टाक्या, स्लॅब तकलादू झाले असून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. त्यामुळे या जलकेंद्राचा पुनर्विकास करुन चारशे एमएलडी (दश लक्ष लिटर) क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून थेट अशुद्ध पाणी पाठवून त्यावर शुद्धीकरणाची प्रकि‘या करता येणार आहे.
शहरातील हौदांचे पुनर्जीवन ः
पेशवे काळापासून पाण्याचे हौद हे पुणे शहराचे वैशिष्ट्य राहीले आहे. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा केला जायचा. जुन्या पुण्यात पाणीपुरवठ्यासाठी हौद हे एक महत्त्वाचे माध्यम होते. आजही शहरात काळा हौद, खाजगीवाले बागेतील हौद, गणेश पेठ हौद, ढमढेरे बोळातील हौद, तांबट हौद, तुळशीबाग हौद, नाना वाड्यासमोरील नाना हौद, पंचहौद, ङ्गरासखाना हौद, बदामी हौद, बुधवार वाड्यातील हौद, पुणे विद्यापीठातील पुष्करणी हौद, शनिवारवाड्यातील पुष्करणी आणि हजारी कारंजे आदी हौद आहेत. यापैकी काहींची दुरावस्था झाली आहे. या हौदांचे पुनर्जीवन करून त्याद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नदीसुधारणा-काठ सौंदर्यीकरण
आंबील ओढा पुनर्विकास ः शहरामध्ये २५ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला महापूर येऊन निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जीवित हानी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ‘आंबिल ओढा पुनर्विकास योजना’ आखण्यात येणार आहे. या योजनेत ओढ्याचे सुशोभिकरण, सिमाभिंतीची बांधणी, पाणी शुद्धीकरण, परिसराचे लॅण्डस्केप डिझायनिंग आणि जॉगिंग ट्रॅकचे विकसन या कामांचा समावेश आहे.
 मुळा मुठा शुद्धीकरण
पुणे शहरात दररोज ७४४ एमएलडी (दश लक्ष मीटर) मैलापाणी निर्माण होते. शुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच नदीत सोडण्यात येणार्‍या दूषित पाण्यामुळे नद्या प्रदूषित होतात. त्या साठी ‘राष्ट्रीय नदी संवर्धन योजने’अंतर्गत प्रकल्प (जायका) हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ९९०.२६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ७० किलोमीटरच्या मैलापाणीवाहिन्या विकसित करण्यात येणार असून अकरा ठिकाणी प्रतिदिन ३९६ एमएलडी क्षमतेची अकरा मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून बाणेर-बालेवाडी परिसरात १९.६० किलोमीटर लांबीच्या मैलापाणीवाहिन्या विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मदत होणार आहे.
नदीकाठ सुधारणा प्रकल्प
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह खडकी कॅन्टोन्मेेंट बोर्डाच्या हद्दीतून वाहणार्‍या मुळा-मुठा नदीच्या ८८ किलोमीटर लांबीच्या काठ विकसन आणि संवर्धनाची योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी २ हजार ६१९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करून आराखड्याचा मसुदाही तयार केला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले आहे. त्यानुसार नदीकाठ सुधारणेच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पामुळे मुळा-मुठेची वहन क्षमता वाढणार आहे, पात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितता पुरविता येणार आहे, नदीकाठाचे सुशोभीकरण होणार आहे, संपूर्ण नदीकाठ परिसरात वृक्षलागवड केली जाणार आहे.
नालेसफाई मुख्य खात्यामार्फत
पुणे शहरात १५८.३८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ इतकी आहे. पावसाळी गटारांची लांबी १७७.९६७ किलोमीटर आणि कर्ल्व्हटची संख्या ४२९ आहे. नालेसफाई ओढे-नाल्यांमधील राडारोडा उचलणे, नदीतील घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उचलण्याबरोबरच कल्व्हर्ट, पावसाळी गटारांची स्वच्छता करणे आवश्यक असते. मात्र ही कामे योग्य पद्धतीने होतात का नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणा असल्याचे दिसून येत नाही. या पुढील काळात नालेसफाईची कामे मुख्य खात्याच्या मार्ङ्गत करण्यात येणार आहेत. नाले आणि पावसाळी गटारे सफाईच्या कामाची जबाबदारी कोणावर हे निश्‍चित केले जाणार आहे.

सर्वांसाठी वैद्यकीय सुविधा
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय
वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि रुग्णांना किफायतशीर दरांत आरोग्य सेवा मिळाव्यात या साठी पुणे महापालिकेने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयतीन सुरू करावे असे तीन वर्षांपूर्वीच्या अंदाजपत्रकात जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी नेमलेल्या ‘आयएनआय डिझाइन स्टुडिओ’ या सल्लागारांनी सुचविल्याप्रमाणे वैद्यकीय शिक्षण ट्रस्टची निर्मिती करुन महाविद्यालयाची निर्मिती आणि व्यवस्थापन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाच्या १० एकर जागेमध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी पुढील सात वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने महापालिकेला ६२२ कोटी खर्च करावे लागणार आहेत.
नानाजी देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
ह्दयविकार, कर्करोग, किडनी, मज्जातंतूशी संबंधित आजार आणि शस्त्रक्रियेसाठी सुपरस्पेशालिटी सुविधांची आवश्यकता असते. सध्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या एकाही रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पुणे शहरात महापालिकेच्या दहा हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर नानाजी देशमुख सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. खासगी भागीदारीतून लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.
अतिदक्षता विभाग 

पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या ६५ रुग्णालयांपैकी एकाही ठिकाणी अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध नाही. ह्दय, कॅन्सर, किडनी, मधुमेह, श्‍वसनविकार आणि वाढत्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या सं‘येने वाढ होत आहे. अशा रुग्णांना अतिदक्षता विभागाची गरज असते. अतिदक्षता विभागातील उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. त्यासाठी महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारण्याचे काम सुरू आहे. त्याबरोबर दळवी हॉस्पिटल, सोनावणे हॉस्पिटल आणि नायडू हॉस्पिटलमध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावर अतिदक्षता विभाग चालविण्यात येणार आहे.
बालकांसाठी हृदयरोग निदान व उपचार सुविधा
बाळ आईच्या पोटात असताना त्याचे हृदय सामान्य पद्धतीने विकसित  न झाल्यामुळे नवजात बालकांमध्ये ह्दयाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. या विकाराचे वेळेत निदान आणि आवश्यकतेनुसार वेळेवर शस्त्रकि‘या करणे आवश्यक असते. सर्वसामान्य गरीब नागरिकांना या उपचारांचा खर्च परवडत नाही. त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात बालकांचे हृदयरोग निदान आणि उपचार करणारी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
मधुकर बिडकर रक्त पेढी 
शहरामध्ये सध्या पुणे महानगरपालिकेचे १ सर्वसाधारण रुग्णालय, १ सांसर्गिक रुग्णालय, ४७ दवाखाने आणि १८ प्रसुतिगृहे यामार्ङ्गत नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात. परंतु सध्या शहरामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या मालकीची एकही रक्तपेढी नाही. त्यामुळे रक्तासाठी महापालिकेला इतर रुग्णालये आणि रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. यासाठी कमला नेहरू रुग्णालयात ‘मधुकर बिडकर रक्तपेढी’ सुरू करण्यात येणार आहे. महापालिका रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण विशेषतः प्रसूतिगृहातील महिलांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
महिलांमधील कर्करोग निदान
गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमधील स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. भारतात दर वर्षी या कर्करोगामुळे दीड लाख महिलांचा मृत्यू होतो. या कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास होणारा मृत्यू टाळला जाऊ शकतो. पालिकेच्या १८ प्रसुतिगृहांत कर्करोग निदान केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यासाठी पारंपरिक पॅप स्मिअर पद्धत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पद्धतीने निदान होण्यास बराच कालावधी लागतो आणि तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते. परंतु स्मार्ट स्कोप डिव्हाईस यंत्राचा वापर केल्यास कर्करोगाचे तातडीने निदान होऊ शकते. तसेच यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता लागत नाही आणि निदान अचूकतेने होते. लवकरच महापालिकेच्या ८ रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आरोग्य योजनांसाठी स्मार्ट हेल्थ कार्ड 
पुणे महापालिकेच्या वतीने शहरी गरीब योजना, आजी-माजी सभासदांसाठी आरोग्य योजना, मनपा कर्मचार्‍यांसाठी आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी योजना, किशोरवयीन मुलींची, महिलांची आरोग्य तपासणी, डायग्नोसिस सेंटर, डायलेसिस सेंटर आदी योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये सुसुत्रता यावी आणि लाभार्थ्याविषयी आरोग्यविषयक माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने सर्व लाभार्थ्यांना आधुनिक ‘स्मार्ट हेल्थ कार्ड’ दिले जाणार आहे. हे कार्ड आधारकार्डशी जोडण्यात येणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.
मुकुंदराव लेले दवाखान्यात पॅथॉलॉजी लॅब ः
आजारांचे निदान करण्यासाठी रक्त, शर्करा,लघवी, थुंकी आदीच्या चाचण्या कराव्या लागतात. या चाचण्या नियमितपणे करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. सर्वसामान्य नागरिकांना पॅथॉलॉजीच्या विविध चाचण्या अत्यल्प दरात करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शनिवारवाड्याजवळील पुणे महानगरपालिकेच्या मुकुंदराव लेले दवाखान्यात सर्व आधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यात येणार आहे.
औषध वितरण व्यवस्थेसाठी सॉफ्टवेअर विकसित करणे ः
पुणे महापालिकेच्या वतीने औषधांची घाऊक खरेदी करून गाडीखाना येथील मध्यवर्ती भांडारातून महापालिकेच्या प्रत्येक दवाखान्यात आणि रुग्णालयात वितरीत केले जाते. या व्यवस्थेत सुसूत्रता नसल्यामुळे अनेकदा एखाद्या दवाखान्यात विशिष्ट प्रकारची औषधे पडून राहतात. मात्र दुसर्‍या एखाद्या दवाखान्यात त्याचा तुटवडा जाणवतो. त्यातून रूग्णांना वेळेत औषधे उपलब्ध होत नाहीत. तुटवडा असणार्‍या औषधांची माहिती दवाखान्यातून मध्यवर्ती भांडाराला दिली जाते. मध्यवर्ती भांडाराकून औषध पुरविण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्याचा थेट फटका रुग्णांना बसतो. त्यामुळे औषध वितरण व्यवस्थापनासाठी महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये आणि मध्यवर्ती भांडार एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशाने सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे.
वैकुंठ स्मशानभूमी पुनर्विकास ः 
अद्ययावत साधनांनी परिपूर्ण भारतातील पहिली स्मशानभूमी ‘वैकुंठ’ची सुरुवात ५ जून १९७१ रोजी झाली. पन्नास वर्षांनंतर आता वैकुंठ स्मशानभूमीच्या पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे. वैकुंठ स्मशानभूमी आणि परिसराचे लॅण्डस्केप डिझायनिंग करुन सुशोभिकरण, विद्युतदाहिन्यांची सं‘या वाढविणे, वाय-फाय सुविधा, अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्थेत वाढ करणे, महिला व पुरुषांसाठी स्मार्ट स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गरम पाण्याची सुविधा, स्नानगृहे, प्रसादासाठी स्वतंत्र कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता, प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना, निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, अस्थी जतन करण्यासाठी लॉकरची सुविधा, ध्वनिक्षेपण व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, कार्यालयाचे संगणकीकरण, ऑनलाईन पास, कर्मचार्‍यांसाठी सुविधा आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. याच धर्तीवर पुढील काळात शहरातील सर्व धर्मांच्या स्मशानभुमीत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
पुष्पक सेवा ः 
निधन झालेल्या व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्ङ्गत (पीएमपी) पुष्पक शववाहिनी सेवा देण्यात येते. पीएमपीच्या शववाहिनी सेवेच्या बस २० वर्षे जुन्या झाल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यातील एकाही बसला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) शववाहिनी म्हणून वापराची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचा फटका हजारो पुणेकरांना बसत आहे. याचा विचार करुन पुणे महानगरपालिकेच्या पाच विभागांसाठी पाच नवीन बसगाड्या घेण्यात येणार आहेत.
शित शवपेटी ः 
शहरात रोज साधारणपणे ५० नागरिकांचा मृत्यू होतो. त्यापैकी किमान आठ मृतदेह शितशवपेटीत ठेवले जातात. सध्या काही खासगी रुग्णालयांमध्ये आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात शितशवपेटीची सोय आहे. खाजगी रुग्णालयांतील शितशवपेट्यांची क्षमता कमी असून, त्याचे दरही सामान्यांना परवडत नसल्याचे दिसून येते. याचबरोबर काही खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्याकडील रुग्णांचेच मृतदेह शितशवपेटीत ठेवतात. ससून रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे गरीब कुटुंबातील मृतांना शवागाराची सुविधा मिळत नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३१ शितशवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पुणे होणार योग सिटी ः 
शारीरिक व्यायाम, भावनात्मक समतोल आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुणे शहरामध्ये योग प्रशिक्षण देणार्‍या प्रथितयश संस्था आहेत. शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य, योगासने आणि व्यायामाबाबत जागृती आहे. त्यामुळेच पुणे शहराची जगाच्या पाठीवर ‘योग सिटी’ म्हणून ओळख व्हावी यासाठी विविध योजनांची आखणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये योग केंद्र, प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण संस्था, महापालिकेच्या सर्व शाळा आणि उद्यानांमध्ये प्रशिक्षक उपलब्ध करून देऊन योगासनांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
स्मार्ट स्वच्छतागृहे ः
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्याया कमी आहे. त्यातही महिलांच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण कमी आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. तसेच सध्या अस्तित्वात असलेली महिला स्वच्छतागृहे आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांतील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. नियमित आणि स्मार्ट पद्धतीने स्वच्छतागृहांची देखभाल करण्याचे नियोजन आहे.


घनकचरा व्यवस्थापन, वीजनिर्मिती
प्रस्तावित कचरा प्रकल्प
 ः पुणे शहरातील उपनगरात निर्माण होणारा कचरा त्याच भागात प्रकि‘या करून जिरविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने भूगांव आणि बावधान येथे २ एकर जागा उपलब्ध करून घेतली आहे. या ठिकाणी यांत्रिकीकरण करून आधुनिक रॅम्प निर्माण करण्यात असून, १०० मेट्रिक टन मिश्र कचर्‍यावर प्रकि‘या करणारा प्रकल्प प्रस्तावित आहे. उरूळी ङ्गुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये १० एकर जागेवर शास्त्रोक्त भू-भराव टाकण्यात येणार आहे. मलनिःसारण विभागाच्या वतीने हडपसर-रामटेकडी येथे बायो एनर्जी प्रकल्पाकरिता मान्य करारनाम्यानुसार २ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
ई कचरा संशोधन केंद्र ः 

पुणे शहरात दर वर्षी अंदाजे २०० टन ई-कचर्‍याची निर्मिती होते. त्यापैकी केवळ १० ते २० टक्के कचरा संकलित होतो. साठून राहिलेला ई-कचरा संकलन करण्यासाठी विविध भागात केंद्रांची सं‘या वाढविण्यात येणार असून, जनजागृतीचा कार्यक्र‘म हाती घेण्यात येणार आहे. या योजनेचा भाग म्हणून ई-कचर्‍याची विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या कचर्‍याचे संकलन, त्याचा कमीत कमी वापर, पुनर्वापर आणि हानिकारक पदार्थांची विल्हेवाट लावणे या प्रकारची कामे आणि संशोधन केले जाणार आहे.
टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणे प्रशिक्षण केंद्र ः 
टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविण्याचे उपक्रम लोकप्रिय ठरत आहेत. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि महिलांचा समावेश मोठा आहे. महिला बचतगट आणि विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंचे पुनर्चक‘ीकरण करून टिकाऊ वस्तू निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देणारे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात वापरलेल्या, बंद पडलेल्या, बिघडलेल्या वस्तू व उपकरणांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे प्रयोग शिकविले जाणार आहेत. या केंद्राची इमारतीसाठी अधिकाधिक टाकाऊ वस्तूंचा वापर केला जाणार आहे.
कचर्‍यावर प्रकि‘या करणारे प्रकल्प ः 
केशवनगर (५० मेट्रिक टन), रामटेकडी (१२५ मेट्रिक टन), वडगावशेरी (२५ मेट्रिक टन), बिबवेवाडी (५० मेट्रिक टन), आंबेगाव (१०० मेट्रिक टन), लोहगाव (१०० मेट्रिक टन) आणि हडपसर-रामटेकडी (२०० मेट्रिक टन) या प्रकल्पांमध्ये दररोज ६५० मेट्रिक टन कचर्‍याचे यांत्रिकी पद्धतीने वर्गीकरण करण्यात येते. केशवनगर येथे दररोज १०० मेट्रिक टन मिश्र कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. रामटेकडी-हडपसर येथे ७५० मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करून १३.५ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.

वैशिष्ट्येपूर्ण उद्याने, पर्यावरण संवर्धन
सारसबागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ ः 

उद्यान विभागाअंतर्गत सारसबाग आणि पेशवेपार्क या दोन उद्यानांचा ५० वर्षांपूर्वी एकत्रित कायापालट करण्यात आला होता. आगामी वर्षात सारसबाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा व मास्टरप्लान तयार करून ३२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन्स निर्माण करण्यात येणार आहे. गणेश मंदिर व श्री देवदेवेश्वर संस्थान मध्यभागी ठेवून येथील वृक्षांना जैव विविधतेला धक्का न लावता बागेच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुण्यातील पहिले बायोडायर्व्हसिटी सेंटर, ग्रंथालय, इकॉलॉजी स्टडीसाठी अध्ययन आणि माहिती केंद्र, पहिली होर्टिकल्चर पार्क, सिझनल फुलझाडांकरिता कायमचे फ्लावर गार्डन, अंबिल ओढ्याच्या काठाचा आणि पावसाचा विचार करून रेझिलियंट विकास, पूरसदृश परिस्थितीत दोन्ही काठांवर पाणी जमिनीत शोषून घेण्यास मदत करतील, विस्तीर्ण वृक्षांचा व सावलीचा मोकळा परिसर आदी बाबींचा प्रकल्पात समावेश असणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करणे, पर्यावरण रक्षण, हरित क्षेत्रात नूतन मास्टर प्लॅनिंग, सांस्कृतिक क्षेत्राचा विचार करून नूतन रचनेचे बहुआयामी व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधा पुरविणे, स्मार्ट सिटी व अर्बन प्लेस मेकिंगच्या मूल्यांचा विचार करण्यात येणार आहे. सारसबागेची रचना रस्त्यालगत करण्यात येणार असून, नवीन प्रकल्पात वाहनतळ, हॉकर झोन, फूड प्लाझा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. हॉकर झोन आणि  फूड  प्लाझा स्थलांतरीत केल्याने परिसरातील रस्ते मोकळे होतील. हा प्रकल्प बीओटी किंवा पीपीपी तत्त्वावर राबविण्याचे नियोजन आहे.

सुषमा स्वराज संवेदना पार्क ः 

दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याविषयी सामान्य नागरिकांमध्ये जाणीव नसते. सामन्य नागरिकांमध्ये दिव्यांगाविषयी जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने पुणे शहरात‘सुषमा स्वराज संवेदना पार्क’ उभारण्यात येणार आहे. स्पर्श, वास, घाण आणि श्रवण यांच्या माध्यमांतून वनस्पतींचे ज्ञान होणार आहे. उद्यानामध्ये ४२ प्रकारांची झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांविषयी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत विस्तृत माहिती दिली जाईल. पक्षांचे नैसर्गिक आणि कृत्रिम आवाज ऐकता येतील, रेलिंग पाईपवर लावलेल्या उकेरी ब्रेल लिपीमुळे अंध व्यक्ती कोणाच्याही आधाराशिवाय उद्यानात एकटे ङ्गिरू शकतील. झायलोङ्गोन, साउंड सिस्टिम,  घाण  उद्दीपनाचे कारंजे, सेन्सरी पार्क, वाळू व एक्युप्रेशर कॉर्नर, स्लाईड, जब्म्बल जिम, बेल स्टेल, टेलर ड्रेम, फ्लेश कार्ड, करन्सी चेकर आदी सुविधा असणार आहेत.
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ः 
इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञान हे यापुढील कालावधीत जागतिक स्तरावर दळणवळणाच्या क्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवून आणणारी बाब ठरणार आहे. या वाहनांमुळे देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी होईल. पर्यायाने कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी झाल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पर्यावरणपूरक स्वस्त इंधन खर्च, वाहनांची देखभाल कमी होणे इत्यादी बाबत मदत होणार आहे. ही वाहने सुरक्षित, किङ्गायतशीर, पर्यावरणपूरक आहेत. भारत सरकारने २०३० पर्यंत ’इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन’ घडविण्याची योजना आखली आहे. या योजनेचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेच्या विविध इमारतीतील ५० वाहनतळांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे नियोजन आहे.
उद्यान विविध विकासकामे ः 
कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग‘हालयातील हत्तीसाठी पोहोण्याच्या तलावाचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी प्राण्यांसाठी खंदक, सिंह खंदक, रस्टी स्पॉटेड कॅट, लेसर कॅट, शेकरु तसेच रेप्टाइल पार्कची काम प्रगती पथावर आहेत. वडगावशेरीत दिव्यागांसाठी अडथळा विरहीत उद्यान विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लोहगाव, विमाननगर येथे बालकांकरिता वैशिष्टयपूर्ण उद्यान विकसित करण्यात येत आहे. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल जवळील नियोजित उद्यानाचे काम या वर्षी पूर्ण केले जाणार आहे. बावधन येथील उद्यानाचे काम प्रगतीपथावर असून, कोथरुड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान सुशोभिकरणाचे काम सुरु आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा सुविधा
गुणवत्तापूर्ण शिक्षण ः 

पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेअंतर्गत गणवेश, स्वेटर, दप्तरे, बूटमोजे, वह्या, पुस्तके, पाट्या, चित्रकला साहित्य, शालेय पोषण आहार, क्रीडानिकेतन आणि विद्यानिकेतन शाळांमधील साहित्य विनामूल्य, ई-लर्निंग सुविधा आदी उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने आणि प्रशिक्षकाची सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, स्मार्ट स्वच्छतागृहे, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा आदी उपाययोजना प्रभावीपणे करण्यात येणार आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध आहे.
खगोलशास्त्रासाठी विशेष तरतूद
पुणे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक सहली, मार्गदर्शनपर व्याख्याने, परिसंवाद अशा उपक‘मांचा समावेश असणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २० लाख रुपये )
छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कायापालट ः
पुणे महापालिकेच्या वतीने शिवाजी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) दरवर्षी २०० हून अधिक विद्यार्थी विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेत असतात. या ठिकाणी ङ्गिटर, इलेक्ट्रिशन, कारपेंटर आदी ट्रेड शिकविले जातात. हे ट्रेड शिकविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मशिन अत्यंत जुन्या झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. तसेच वास्तूची डागडुजी करून कायापालट करण्यात येणार आहे.
दहावी बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ः 
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात इयत्ता दहावी आणि बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना एस. एस. सी. आणि एच. एस. सी. बोर्डाचे परीक्षा शुल्क भरावे लागत होते. बहुसं‘य विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना हे शुल्क भरता येत नाही. परिणामी त्यांचे शिक्षण खंडीत होण्याची भीती असते. त्यामुळे पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील माध्यमिक शाळांमध्ये शिकणार्‍या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे शुल्क भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिका ः 
पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट, रेनकोट, स्वेटर, पीएमपीएमएलचा प्रवास, पोषण आहार आदी सुविधा विनामूल्य दिल्या जातात. मात्र या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणार्‍या उत्तरपत्रिका स्वतः विकत आणाव्या लागतात. अनेक विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना उत्तरपत्रिका परवडत नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना लागणार्‍या उत्तरपत्रिका या शैक्षणिक वर्षापासून विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे ः 
‘विद्येचे माहेरघर’ अशी पुणे शहराची ओळख आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पुणे शहरात येतात. राज्याच्या ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांची सं‘या मोठी आहे. शहरातील निवास आणि भोजनासारखे खर्च या विद्यार्थ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. या गैरसोयीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या अवती-भवतीच्या परिसरात महापालिकेच्या वतीने वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची शिवनेरी किल्ल्यावर सहल ः
 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थळ पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवरायांचे आदर्श नेतृत्त्व, पराक्रम, निष्कलंक चारित्र्य, अग्रेसर नेतृत्त्व, अद्वितीयता, मुत्सद्देगिरी, पोलादी निर्धार, संघटन, रणनीती, व्यवस्थापन कौशल्ये, दूरदृष्टी, नियोजन, निर्णायकता, कमालीचा आत्मविश्‍वास आदी गुणांचे विद्यार्थ्यांमध्ये संवर्धन व्हावे या उद्देशाने दर वर्षी पुणे महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी  शिवनेरीवर सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
शुक्रवार पेठ आणि सदाशिव पेठेत क्रीडा संकुल ः 
पुणे महापालिका क्षेत्रातील क्रीडा आरक्षित जागांवर क्रीडा संकुल आणि क्रीडांगणे विकसित करण्याचे पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे धोरण आहे. कबड्डी, खोखो, मल्लखांब अशा सारखे मैदानी खेळ, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, लॉन टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, रायफल शूटिंग केंद्र, बॉक्सिंग हॉल, स्केटिंग ग्राउंड आदी क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण आणि सरावासाठी क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्यात येते. क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन क्रीडा संस्थांच्या माध्यमातून केले जाते. शुक‘वार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानावर क्रीडा आरक्षण आहे. या क्रीडा धोरणाला अनुसरून शुक‘वार पेठेत आणि सदाशिव पेठेत क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन आहे.

क्रीडा महोत्सव ः पुणे शहरामध्ये  क्रीडा   संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार आणि जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे महापालिकेचे कर्तव्य आहे. महापालिकेच्या  क्रीडा   धोरणाला अनुसरून महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शालेय क‘ीडा स्पर्धा घेतल्या जातात. दरवर्षी महापौर चषक  क्रीडा   स्पर्धांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय  क्रीडा   स्पर्धेच्या धर्तीवर या सर्व स्पर्धांचे दरवर्षी ठराविक पंधरा दिवसांच्या कालावधीत आयोजन करून  क्रीडा  डाविषयक जनजागृती करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने या वर्षीपासून  क्रीडा   महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे.
क्रीडा   धोरण ः 

शालेय  क्रीडा   धोरण, शालेय  क्रीडा   स्पर्धा,  क्रीडा   शिक्षकांना पुरस्कार,  क्रीडा   अभियान, कर्मचार्‍यांना खेळासाठी प्रोत्साहन,  क्रीडा   नर्सरी, अनिवासी खेळाडूंसाठी क्रीडा   निकेतन, स्पोर्टस म्युझियम आणि  क्रीडा   माहिती केंद्र,  क्रीडा   आरक्षित जागांवर  क्री डांगणे आणि  क्रीडा   संकुले विकसित करणे, खेळाडू दत्तक योजना, खेळाडूंसाठी  क्रीडा   सुविधा, खेळाडूंकरीता महानगरपालिकेत नोकरीचे आरक्षण,  क्रीडा  साहित्य अनुदान,  क्रीडा  शिष्यवृत्ती योजना, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पारितोषिके,  क्रीडा   स्पर्धांचे आयोजन, शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंचा सत्कार, साहसी खेळांना अर्थसहाय्य, अपघात विमा योजना आदी  क्रीडा  धोरणातील योजनांची अंमलबजावणी करणार आहे.

समाविष्ट गावे
स्मार्ट व्हिलेज ः 
शासन निर्णयानुसार ४ ऑक्टोबर २०१७ रोजी पुणे महानगरपालिकेत नव्याने अकरा गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. गावातील विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यात येत असून, ‘गोखले इन्स्टिट्यूटस ऑफ पॉलिटिक्स ऍण्ड इकॉनॉमिक्स’ ही संस्था लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक विश्‍लेषणाचा अभ्यास करून भविष्यकालीन आढावा घेत आहे. या गावांसाठी ’स्मार्ट व्हिलेज’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रकारच्या सोयीसुविधा या योजनेत दिली जातील. पहिल्या टप्प्यात लोहगाव आणि मुंढवा या दोन गावांसाठी ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.

समाविष्ट गावातील विकासकामे ः 

सन २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत ११ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. समाविष्ट गावांचा प्रारुप विकास आरााखडा तयार करून नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विकास आराखड्याची संपूर्ण वैधानिक प्रकि‘या पूर्ण करुन मु‘य सभेच्या मान्यतेने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. समाविष्ट गावांमध्ये रस्ते आणि पदपथ निर्माण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य सुविधा, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, शाळांमध्ये मूलभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृहांच्या सुविधा, मैलापाणी शुद्धीकरण, नाल्यांची स्वच्छता, पथदिवे बसविणे आदी विकासकामे केली जाणार आहेत.

सर्वांसाठी परवडणारी घरे
नगर रचना योजना टी. पी. स्किम ः 

केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर नगर रचना योजना राबविण्यासाठी देशभरातील २५ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहराचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांपैकी उरुळी देवाची आणि ङ्गुरसुंगी या दोन गावांमध्ये नगर रचना योजना (टी. पी. स्किम) राबविण्यात येणार आहे. शहराच्या भोवती वर्तुळाकार मार्गाचे भूसंपादन करण्यात येत आहे. भूसंपादन करत असताना नगर रचना योजना राबवल्यास भूसंपादनाची प्रकि‘या अधिक सोपी होणार आहे. नागरिकांनासुद्धा याचा ङ्गायदा होणार आहे. ही योजना राबवल्याने या ठिकाणच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक जागा, अंतर्गत रस्ते महापालिकेच्या ताब्यात येऊन या भागाचा सुनियोजित विकास करणे शक्य होणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ः 
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचे पुणे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामधून परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. अल्प उत्पन्न गटातील सदनिका बांधण्यासाठी हडपसर, खराडी, वडगाव या परिसरातील आठ सविस्तर प्रकल्प अहवालांना केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याद्वारे ३० चौरस मीटर क्षेत्रङ्गळाच्या ६२६४ सदनिका बांधण्यात येणार आहेत. खराडी येथे ७८६ आणि हडपसर येथे ३४० सदनिका बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वडगाव खुर्द येथे ११०८ सदनिका बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत कलाग्राम ः  
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत दिल्लीतील प्रीतमपूर आणि जनकपुरी या दोन्ही ठिकाणच्या ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर ‘ कलाग्राम  ’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शहर, जिल्ह्यातील कलाकारांबरोबरच देशविदेशातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी आणि विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. पारंपरिक कलांचे सादरीकरण, हस्तकलेच्या वस्तूंची खरेदी आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्प ः 
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत रस्ते, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, पाणीपुरवठा, सुरक्षितता, स्वयंरोजगार आदी विभागांमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ई-बस, ई-रिक्षा, सायकल योजना, वाय-फाय, ई-कनेक्टिव्हिटी, घनकचरा व्यवस्थापन, स्काडा, पाणीपुरवठा योजना, स्मार्ट पर्यटन, सीसीटीव्ही कॅमेरे, पदपथांवर एलईडी दिवे, पीएमसी केयर आदी योजना राबविण्यात येणार आहेत.
हरित क्षेत्र विकास प्रकल्प ः 
केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पा अंतर्गत हडपसर येथे कॅनॉल लगतच्या जागेमध्ये तारेचे कुंपन घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जागेत वृक्षारोपण, ठिबक सिंचन, सुशोभिकरण आदी विकासकामे केली जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत उरळी देवाची येथे वृक्षारोपणाचे काम सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये ९ हजार वृक्ष लावण्यात आले आहेत.

शिवसृष्टी, स्मारके, वारसा प्रकल्प, सांस्कृतिक
शिवसृष्टी ः 

‘शिवसृष्टी’च्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात येणार आहे. चांदणी चौकातील जैवविविधता उद्यानाच्या (बीडीपी) ५० एकर जागेत ‘शिवसृष्टी’ उभारण्यास विशेष बाब म्हणून राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ‘शिवसृष्टी’च्या निर्मितीला वेग देण्यासाठी भूसंपादनाची कामे सुरू आहेत. अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेशी भव्य ‘शिवसृष्टी’ साकारण्यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध आहे.
लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव संग‘हालय लोकमान्य टिळकांनी उत्सवाचे धार्मिक स्वरूप बदलले व त्यास सार्वजनिक स्वरूप दिले. लोकांच्या मनात असलेल्या उत्सवप्रियतेचा वापर करून सार्‍या समाजाला एकवटण्याचा प्रयत्न टिळकांनी केला. तो केवळ सार्वजनिक उत्सव राहिला नाही तर राष्ट्रीय उत्सव बनला आणि महाराष्ट्रात सर्वत्र नव्हे तर बनारस, कलकत्ता, हैदराबाद हुबळी या शहरांमध्ये पसरला. हिंदु-मुस्लिम समाजाचे ऐक्य तसेच लोकमान्यांनी मांडलेल्या चतुःसूत्रीचा प्रसार या उत्सवातून मोठ्या प्रमाणात केला गेला. पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. लाखो नागरिक उत्सवाच्या काळात पुण्यात येतात. पुण्याच्या गणेशोत्सवाचा समग‘ इतिहास आणि विद्यमान गणेशोत्सवाचे विधायक रुप याचे दर्शन घडविणारे कायमस्वरूपी संग‘हालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे सारे पैलू या संग‘हालयात पाहावयास मिळतील.
कोथरूड येथे कला अकादमी ः 
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. साहित्य, कला, संस्कृती, नृत्य, संगीत, अभिनय, चित्रपट, नाटक, लोककला आदी क्षेत्रातील मान्यवर संस्थांचे माहेरघर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर कलाकार पुण्यात वास्तव्याला आहेत. सर्व कला प्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी कलाकारांची बर्‍याच वर्षांपासून मागणी आहे. त्यामुळे ‘गोवा अकादमी’च्या धर्तीवर कोथरुड येथे कला अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. विविध कलांच्या प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक स्मारक सुशोभिकरण ः
  इंग्रजांविरूद्ध लढा देणार्‍या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा देशभक्तीचा इतिहास प्रेरणादायी आहे. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८५७ मध्ये उठाव झाला. परंतु त्याही पूर्वी उमाजी नाईक यांनी इंग‘जांविरूद्ध लढा सुरू केला होता. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना येथील मामलेदार कचेरीलगतच्या परिसरात ङ्गासावर लटकावले. या ठिकाणी  आद्य क्रांतिकारक   उमाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. राज्य सरकारने या स्मारकाचा समावेश ‘हेरिटेज ब’ वर्गात केला आहे. या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
आद्य क‘ांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक ः आद्य क‘ांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील त्यांच्या समाधी स्थळावर स्मारक उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. राज्य सरकारने विकास आराखड्यात हे आरक्षण कायम केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात वीर लहुजींचे योगदान मोलाचे होते. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वासुदेव बळवंत ङ्गडके आदींचे ते प्रेरणा स्थान होते. वीर लहुजींच्या स्मारकाची प्रकि‘या लवकरच सुरू होणार आहे. तसेच गंज पेठेत लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मराठी साहित्य संमेलन ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ओळख समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अशी आहे. त्यांचे लेखन सामाजिक व राजकीयदृष्ट्या कृतीशिलतेवर आधारित आहे. त्यांच्या पोवाडा आणि लावणी यांसार‘या लोककथात्मक कळा शैलींच्या वापराने ते लोकप्रिय ठरले आणि त्यांचे कार्य समाजात सर्वदूर पोहोचले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मराठी साहित्य संमेलन हा उपक‘म येत्या वर्षांपासून सुरू करण्यात येईल. महापालिकेची मराठी भाषा संवर्धन समिती, सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचा अध्यासन विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी संस्थांचा या उपक‘मात सहयोग घेतला जाईल.

शहरातील प्रवेशद्वारांचे सुशोभिकरण ः पुणे हे ऐतिहासिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, औद्योगिक, वैज्ञानिक, माहिती-तंत्रज्ञान आणि संरक्षणदृष्ट्या देशातील महत्त्वाचे महानगर आहे. पुणे-मुंबई, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा आदी मार्गाने नागरिक पुणे शहरात प्रवेश करीत असतात. या सर्व महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर पुण्याची ओळख सांगणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण कमानी करून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. पुण्याची देशात स्वतंत्र ओळख आहेच, ती वृद्धिगंत होण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
वारकरी सांस्कृतिक भवन ः पंढरपूर, आळंदी, देहू आदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नियमितपणे जाणार्‍या वारकर्‍यांची सं‘या खूप मोठी आहे. या वारकर्‍यांची निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वारकरी सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी कमलेश बहादूरसिंग झाला यांनी स्वतःच्या मालकीची जमीन महापालिकेला उपलब्ध करून दिली आहे.
हज हाउस? ः पश्‍चिम महाराष्ट्रातून पवित्र हज यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांची सं‘या मोठी आहे. मुंबईतील हज हाउसमध्ये अनेकदा निवासाची व्यवस्था होऊ शकत नाही. अशा भाविकांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेच्या वतीने हज हाउस उभारण्यात येणार आहे.
तुळशीबागेत वॉकिंग प्लाझा ः लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्याच्या लगतची पेशवेकालिन तुळशीबाग श्रीरामाचे ऐतिहासिक मंदीर आणि गणपती, शंकर, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि दत्तात्रयांच्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रीयन पाककलेशी संबंधित साहित्य, कॉस्मॅटिक, ज्वेलरी आणि नित्यगृहोपयोगी वस्तू मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे तुळशीबाग असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच महिला आणि युवतींना तुळशीबागेचे विशेष आकर्षण आहे. अशा ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावसायिक बाजारपेठ असणार्‍या तुळशीबाग परिसरात दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी वॉकिंग प्लाझाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हेरिटेज वॉक ः पुण्यात येणार्‍या देश-विदेशातील पर्यटकांना जुन्या शहराची, ऐतिहासिक वारसास्थळांची, जुन्या परंपरांची ओळख करून देणारा ‘हेरिटेज वॉक’ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शहराची संस्कृती-परंपरा पर्यटकांना माहित व्हावी, या उद्देशाने हा ‘हेरिटेज वॉक’ सुरू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका मु‘य इमारत, शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवारवाडा, मुजुमदार वाडा, ङ्गणी आळी तालीम, कसबा गणपती, लाल महाल, नाना वाडा, भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्‍वरी, भिडे वाडा, बेलबाग विष्णू मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर, महात्मा ङ्गुले मंडई, बुरुड आळी, तुळशीबाग राम मंदिर, विश्रामबागवाडा आदी ठिकाणांचा ‘हेरिटेज वॉक’मध्ये समावेश असणार आहे.
वारसा जतन संवर्धन ः पुणे शहराचे वैभव असलेल्या लाल महाल, शनिवारवाडा, नानावाडा, विश्रामबागवाडा, महात्मा ङ्गुले मंडई आदी वास्तुंच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहराचा ‘हेरिटेज टुरिझम मास्टर प्लॅन’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. नाना वाड्यातील आद्य सशस्त्र क‘ांतिकारकांच्या जीवनचरित्रावरील संग‘हालयाच्या दुसर्‍या ङ्गेजचे काम करण्यात येणार आहे. ऐतिहासिक लाल महाल आणि सिंहगड किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ येथे विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. चित्रकला, शिल्पकला सराव व प्रात्यक्षिकांसाठी पर्वती पायथ्याजवळ बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

समाज कल्याणकारी योजना
बारा बलुतेदारांसाठी प्रशिक्षण ः आपल्या समाज रचनेचे वैशिष्ट्य असणार्‍या बारा बलुतेदार पद्धतीला आधुनिक ’टच’ देण्याच्या उद्देशाने  कौशल्य विकास आणि संवर्धनासाठी प्रशिक्षण हाती घेण्यात येणार आहे. १८ ते ५० वयोगटातील व्यक्तिंसाठी शंभरहून अधिक अल्प मुदतीचे अभ्यासक‘म शिकविले जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत खादी ग‘ामोद्योग आयोगाच्या मार्ङ्गत नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असलेल्या केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक भवन ः महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार त्यांच्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न लक्षात घेऊन त्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, कायदेविषयक मार्गर्शन व्हावे, खेळ आणि मनोरंजनाच्या माध्यमांतून विरंगुळा मिळावा, सांस्कृतिक कार्यक‘मांचे आयोजन करता यावे या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्यात येणार आहे.

समाजकल्याण विविध योजना ः पुणे महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय, अल्पसं‘यांक आणि अपंगांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांची व्याप्ती वाढविली जाणार आहे. स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी टिंगरेनगर आणि वडगावशेरीत ‘लाईट हाऊस’ प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. महिलांच्या सुरक्षितेसाठी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा मॅपिंग आणि सुरक्षा अहवाल तयार करण्यात येणार आहे. एमपीएससी, यूपीएससी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन मु‘य परीक्षेला पात्र होणार्‍या गुणानुक‘मे प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.

पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन ः पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळ कार्यालयाच्या हद्दीमध्ये ङ्गेरीवाले सर्वेक्षण, हॉकर्सचे पुनर्वसन करणे, शेतकरी आठवडे बाजार नियमित करणे, गोडावून बांधणे, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित करणे, पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाकरिता विविध ठिकाणी ओटे मार्केट बांधणे, अतिक‘मण विभागाने कारवाई करून आणलेल्या मालाची टॅगिंग पद्धतीने ठेवणे, संगणक प्रणाली विकसित करणे, ङ्गेरीवाले सर्वेक्षण व यंत्रणा राबविण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करणे आदी विकासकामे करण्यात येणार आहेत.

विद्युत आणि सीसीटीव्ही कॅमेरे
विद्युत विविध विकासकामे ः पुणे शहरातील पथ दिवे सक्षम व अद्ययावत करण्यात येणार असून, नदीवरील पुलांचे सुशोभिकरण, नवीन पोलसाठी पर्यावरणपूरक व वीजेची बचत करणारे एलईडी दिवे आदी विकासकामे करण्यात येणार आहेत.

कसबा मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरे ः

 गुन्हेगारी प्रवृत्तींना पायबंद बसावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने कसबा विधानसभा मतदारसंघातील मु‘य रस्ते, चौक, शाळा, दवाखाने, उद्याने, बाजारपेठा, गृहनिर्माण संस्था आदी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची यंत्रणा बसवून ती मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना ही यंत्रणा उपयुक्त ठरू शकेल.

माहिती तंत्रज्ञान
पुणे महानगरपालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने पीएमसी केअर २, डीबीटी, ई लर्निंग, ऑनलाईन डॅशबोर्डच्या माध्यमातून सेंट्रलाईज्ड प्लॅटङ्गॉर्म आदी सेवा-सुविधा दिल्या जातात. नगरसचिव विभागाचे दस्तऐवज स्कॅनिंग, एन्टरप्राईज जीआयएस, नेटवर्क इफ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन, सुरक्षा प्रणाली विकसित करणे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर, विविधप्रकारच्या कार्यालयीन व्यवस्थापनासाठी ईआरपी प्रकल्प, आर्टिफिशिअल इन्टिलिजन्स, बॅकअप सोल्यूशन, कॉल सेंटर, प्रॉपर्टी टॅक्स सॉफ्टवेअर आदी योजना प्रस्तावित आहेत.

कामगार कल्याण
पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. कायम आस्थापनेवरील कर्मचार्‍याला अपंगत्व आल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास नामनिर्देशित वारसदारास विमा निधी म्हणून रक्कम मिळावी या हेतूने अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. कामगार कल्याण निधीतून विविध कल्याणकारी योजना आणि उपक‘म राबविण्याचे प्रस्तावित आहे.

आपत्कालिन व्यवस्थापन

आपत्कालिन परिस्थितीत उपयुक्त ठरणारी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ आणि ’व्हेईकल यंत्रणा’ खरेदी करण्यात आली आहे. या यंत्रणेत अपघातग‘स्तांचा शोध घेणे, सुटका करणे, संपर्क साधणे आणि प्रथमोपचार आदी सुविधा उपलब्ध आहेत. ती कार्यान्वित करण्यासाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीग‘स्त आणि अपघातग‘स्तांना तातडीचा खर्च देण्यासाठी सहायता निधी उपलब्ध करून दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...