पुणे- महापालिकेतील विरोधी पक्षांकडून २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या निविदा काढताना संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे वारंवार आरोप होत होते . तसेच त्याची फेर निविदा काढण्याची मागणी देखील करण्यात येत होती. दरम्यान आज फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजताच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी महापालिका भवनासमोर फटाके फोडून जल्लोष केला.
२४ तास पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेत रींग झाल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन महापालिकेला ४०० कोटींचा फटका बसणार आहे, असे सांगितले होते. तर शिवसेनेनेही योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सीबीआय चे या संदर्भात आलेले पत्र , खासदार संजय काकडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला हा विषय या पार्श्वभूमीवर अखेर गुरुवारी आयुक्त कुणालकुमार यांनी या निविदा रद्द करण्याचे जाहीर केल्यावर या पक्षांनी जल्लोष केला .
पहा हा जल्लोष आणि यावेळी काय म्हणाले कॉंग्रेस चे गट नेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील … पहा हा व्हिडीओ