पुणे- मराठा आरक्षण या विषयावर विरोधकांना बोलू द्यायचे नाही अशा अट्टाहासा पायी भाजपने सभागृहात नियमबाह्य काम चालविल्याने आणि त्यास नगरसचिव सुनील पारखी हे साथ देत असल्याने आज विरोधकांचे आंदोलन चिघळले असा आरोप कॉंग्रेस चे गट नेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे . सभागृहात देखील यांनी वारंवार याबाबत सत्ताधारी पदाधिकारी आणि नगर सचिवांना वारंवार तंबी दिली आहे .आज झालेल्या मुख्य सभेत आबा बागुल यांनी प्रथम तहकुबी जाहीरपणे मांडली . आणि प्रत्यक्षात नगर सचिवांनी माझ्याकडे 2 तहकुबी आल्या असे म्हटले . प्रत्यक्षात एक तहकुबी मांडली असताना 2 तहकुबी त्यांच्या कडे कशा पोहोचल्या याबाबत शिंदे यांनी सभागृहातही त्यांना विचारणा केली .त्यानंतर या संदर्भात माध्यमाशी बोलताना पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे .