पुणे- आपण ओबीसी असल्याने आपल्याला महापौर बोलू देत नाहीत असा आरोप करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांच्या कडून बेजबाबदार वक्तव्ये सभागृहात करण्यात येत असून सभागृहाच्या कामकाजात ते अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप एका पत्रकान्वये सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे .
नेमके भिमाले यांनी काय म्हटले आहे त वाचण्यासाठी आम्ही त्यांनी प्रसिद्धीस पाठविलेले पत्र च येथे देत आहोत …
१९ जुलै रोजी ससाणे यांनी मुख्य सभेतून सभात्याग केला आणि त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांकडे ‘आपण ओबीसी असल्याने बोलू दिले जात नाही ‘ असे वक्तव्य नोंदविणारे पत्रक काढले .या वक्तव्याचा मी निषेध करत आहे असे भिमाले यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .