पुणे- महापालिकेने दोन वेळा जाहिरात देवूनही ,मुदतवाढ देवूनही चार कामाचे टेंडर एकाच कंपनीने भरल्याने पालिका प्रशासनाने तेच आता स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवले आहे .तर अन्य 2 कामांबाबतही असाच प्रकार झालेला असून यावर आता स्थायी समिती निर्णय घेणार आहे .
बालगंधर्व रंगमंदिरात फायर फायटिंग च्या कामासाठी ९६ लाख 3 हजार ९८५ रुपयांचे सावरकर भवनाच्या फायर फायटिंग च्या कामासाठी ७१ लाख ९९ हजार १३२ रुपये,यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या याच कामासाठी ७६ लाख २४ हजार रुपये,आणि मंगळवार पेठेतील आंबेडकर भवनात याच कामासाठी ७२ लाख ६२ हजार रुपयांचे टेंडर वारज्यातील एचडी फायरकॉन नावाच्या कंपनीने भरले आहेत . हे चारही टेंडर महापालिकेने केलेली पुर्वगनण पत्रकातील रकमेपेक्षा .50 म्हणजे अर्धा टक्का कमी दराने आलेले आहेत . या कामासाठी २३ डिसेंबर २०१६ रोजी महापालिकेने तीन वर्तमानपत्रातून जाहिरात दिली होती . मात्र याच एकमेव कंपनीची निविदा आली होती . म्हणून पुन्हा निविदेला मुदतवाढ देवून 5 जानेवारी २०१७ रोजी पूर्वी ज्यांना दिली नाही अशा 3 वर्तमान पत्रातून या टेंडर ची जाहिरात देण्यात आली . तरीही हेच एक टेंडर आले . आणि विशेष म्हणजे चारही टेंडर अर्धा टक्के कमी दराने ….
आधुनिक ,स्मार्ट शहरात आलेल्या अशा एकमेव टेंडर ला महापालिका अतिरिक्त आयुक्त (ज) यांनी मान्यता दिली असून आता हे मान्यतेसाठी स्थायी समिती पुढे ठेवण्यात आले आहे . उद्याच्या मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे .
दरम्यान हडपसर क्षेत्रीय कार्यालयांर्गत प्रभाग क्रमांक ४५ येथे हि सार्वजनिक स्वच्छतेसाठी कंत्राटी सेवक नेमण्या साठी आदित्य सप्लायर्स यांचे ८३ लाखाचे साडेअकरा टक्के जादा दाराचे एकमेव टेंडर आले असून ,प्रभाग क्रमांक ४३ मध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या कामासाठी याच आदित्य सप्लायर्स यांचे एकमेव ५९ लाख ४९ हजार रुपयांचे अकरा टक्के जादा दाराचे टेंडर आलेले आहे . हे दोन्ही टेंडर्स महापालिका प्रशासनाने संमत करून मंजुरी साठी स्थायी समितीकडे पाठविले आहेत . आता निर्णय स्थायी समितीने घ्यायचा आहे .
दोनवेळा जाहिरात देवून एकाचेच टेंडर ..स्मार्ट सिटी तला ‘गजहब ‘?
Date:

