पुणे- वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेच्या कामाचे टेंडर रक्कम ४४ कोटी रुपयांनी कमी करूनही आज अखेर एल अँड टी ला झटका …देत फेर टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला . जीच्यावर महापालिका आयुक्त कुणालकुमार यांचे अतिप्रेम असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो त्याच ‘या’ कंपनीला झटका देण्यात आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विरोधकांना साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे .
याप्रकरणाची हकीकत अशी कि, पुणे आणि पिंपरी परिसरातील रस्त्यावर जिथे जिथे वाहतुकीचे सिग्नल्स आहेत अशा ठिकाणी म्हणजे सुमारे ३५० ठिकाणी हि यंत्रणा राबविण्याचे ठरले होते . ज्या बाजूची सर्व वाहने निघून जातील तिथे स्वयंचलित पणे रेड सिग्नल देणे .ज्या बाजूने जास्त वाहनांची गर्दी असेल त्या बाजूस हिरवा सिग्नल देणे .अशा स्वरूपाची हि यंत्रणा राबविण्यासाठी प्रथम या कंपनीने ३३६ कोटी चे टेंडर भरले होते . त्यानंतर विरोधकांनी हे अति होत असल्याचा आरोप केल्यानंतर ४४ कोटीने याबाबतची रक्कम कमी करून हे काम या कंपनीने २९२ कोटी मध्ये करण्याची तयरी दर्शविली होती ..यावर आज झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत चर्चा झाली . यावेळी डॉ .नितीन करीर ,विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले राजेंद्र जगताप आणि संचालक उपस्थित होते . शिवसेनेचे संजय भोसले ,राष्ट्रवादीचे चेतन तुपे तसेच महापौर मुक्ता टिळक,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,रवींद्र धंगेकर यांचा त्यात समावेश होता .
यावेळी संचालकांनी अधिक माहिती घेतली असता ,हि रेड लाईट व्हायलेशन सिस्टीम अवघ्या ३५ ते ३६ ठिकाणीच बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले . तसेच भारतात अशाप्रकारचा प्रकल्प कुठे पाहायला मिळेल काय ?तो पाहून आम्हास याबाबत निर्णय घेता येईल काय ? असा प्रश्न संचालाकंनी उपस्थित केला असता या कंपनीकडून ‘नाही ‘ असे उत्तर चीफ नॉलेज ऑफिसर यांच्याकडून मिळाले .दरम्यान हा प्रकल्प मेकन्झीने २२१ कोटी मध्ये होऊ शकतो तर सीडॅक ने १५० कोटी त होऊ शकतो असे म्हटल्याचे यावेळी बोलले गेले .अखेर यावर चर्चा होवून या प्रकल्पाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला .
दरम्यान आज झालेल्या या बैठकीत स्मार्ट सिटी ला सेनापती बापट रस्त्यावरील इमारतीत कार्यालय देण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने रस्त्यावर १०० इबस आणण्याचा विषय देखील या बैठकीत चर्चिला गेला . या वेळी 3 कंपन्यांनी अशा ई बसेस देण्याची तयारी दर्शविली होती प्रत्यक्षात आतापर्यंत एकाच कंपनीने 1 इबस दिल्याचे सांगण्यात आले . त्यामुळे आणखी कंपन्यांना यामध्ये सहभागी होऊ द्यात असे यावेळी सांगण्यात आले . स्मार्ट सिटी साठी 2 कोटी ६० लाख रुपये देवून प्रकल्प सल्लागार म्हणून ज्या मकेंझी कंपनीची निवड केली गेली होती .त्याच कंपनीने यापुढेही ३० महिन्यासाठी सल्लागार म्हणून ३८ कोटीच्या पॅकेजचा प्रस्ताव ठेवला होता . मात्र त्यास भाजप सह सर्वानीच विरोध केल्याचे वृत्त आहे .
कुणालकुमारांच्या मर्जीतील ( ? ) एल अँड टी ला स्मार्ट झटका …?
Date:

