पुणे- पीएमपीएमएल खाजगीकरण प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष महापौरांवर दबाव आणत असून याप्रकरणी केवळ तेच हालचाली करत आहेत . पालकमंत्र्यांपासून सारे गप्प आहेत असा आरोप आज कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी येथे केला .
स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्य इमारतीपुढे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी निदर्शने केली .विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील, माजी महापौर दत्ता धनकवडे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे ,माजी सभागृहनेते सुभाष जगताप ,सुनील टिंगरे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर,कॉंग्रेसचे अजित दरेकर आणि शिंदे यांच्या सह बाबा धुमाळ, राकेश कामठे, अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते . पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक ….