पुणे – आपल्याच कारकिर्दीत महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते होवून आपले नाव कोनशिलेवर लागावे या अट्टाहासापायी अधुऱ्या इमारतीचे उद्घाटनकरण्याची घाई करण्यात आली आणि त्यामुळे अपुऱ्या अवस्थेतील इमारती ला उद्घाटन समयी गळती लागली या प्रकारामुळे तमाम महापालिका अधिकारी आणि पुणेकरांची नाचक्की झाली यास महापौर जबाबदार असल्याचा आरोप आज मनसे च्या शहर महिला अध्यक्षा ,माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी केला . या नाचक्की मुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी हि त्यांनी यावेळी केली . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (दि.22) महापालिकेत मनसे चे गटनेते नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वा खाली आयुक्त कार्यालया समोर छत्री, रेनकोट घालून आंदोलन करण्यात आले.मात्र आयुक्त कार्यालयात नसल्याने अखेर अतिरिक्त आयुक्तांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले.
बिल्डिंग झाली ब्युटीफुल, काम झाले डर्टीफुल असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी इमारत गळतीविरोधात छत्र्या, रेनकोट घालून जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तसेच या निकृष्ट कामाला जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केले. आपल्या खुर्च्या जाण्याच्या अगोदर इमारतीच्या कोनशिलेवर नाव लावून घेण्याच्या घाईमुळे हा प्रकार झाल्याचा आरोप हि त्यांनी केला.
वसंत मोरे म्हणाले, महापालिका विस्तारित इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल करण्यात आले, त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम चालू असताना सभागृहात पाणी गळती झाली. त्यामुळे उपराष्ट्रपतींसमोर पुण्याची नाचक्की झाली. याला सत्ताधाऱ्यांची घाई कारणीभूत असल्याचा आरोप केला.