पुणे- शिवसृष्टी प्रकल्प होण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मेट्रोच्या डेपोसाठी डीपीआरमध्ये असलेले स्थान याचा विचार करता महामेट्रोचे अधिकारी, पालकमंत्री, इतर पक्षांचे नेते, गटनेते यांना बोलवून चर्चा करूया व त्यातून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी शिवसृष्टी विषयावर आयोजित करण्यात आलेल्या महासभेत स्प्ष्ट केले.
पुणे महापालिकेत कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याबाबतच्या विषयावर खास सभेचे आयोजन केले होते. संबंधित 9 एकर जागेवर स्टेशन उभे करायचे की शिवसृष्टी यावरून 2009 सालापासून वाद सुरू आहे. त्यावरून अनेकदा स्थानिक नगरसेवक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. याच विषयावर जवळपास साडेचार तास चाललेल्या या सभेननंतर बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निश्चित झाले.