पुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी अखेरपर्यंत नगरसेवक विशाल तांबेच्या प्रश्नांचे उत्तर प्रशासनाला देवू दिले नाही . मागे माता रमाई यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी राष्ट्रपती आले होते .यावेळी राजशिष्टाचाराचा भंग केला म्हणून ताशेरे ओढणारे पत्र राष्ट्रपती कार्यालयाने दिले आहे काय ?आता परवा उपराष्ट्रपती महापालिकेच्या एका इमारतीच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्यासाठी काय दक्षता घेतली आहे ? असे प्रश्न तांबे यांनी विचारले होते. यावेळी मत रमाई पुतळा अनावरणासाठीच्या कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांच्या नातलगांना बोलाविले नाही म्हणून निषेध करत अविनाश साळवे आणि भैय्या जाधव यांनी सभात्याग हि केला. या सर्वाकडे दुर्लक्ष करून सभागृहनेते भिमाले यांनी पहा कशी सभा गुंडाळली .