पुणे- भाजप आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष म्हणजे अगदी एकमेकांचे कट्टर विरोधक असा जनतेत समज आहे. . पुण्यात एमआयएम ने एक नगरसेविका निवडून आणून आपले खाते जरूर उघडले आहे . पण या नगरसेविकेला सत्ताधाऱ्यांशी जमवून घेण्याशिवाय बहुधा पर्याय उरलेला नसावा . पालिकेच्या मुख्य सभागृहात गेली तब्बल १ वर्षे विरोधी पक्षांसाठी असलेल्या बाकांवर न बसता भाजपच्या सत्ताधारी गोटात बसून वेळोवेळी भाजपला सभागृहात सपोर्ट करीत वाटचाल करीत आलेल्या एमआयएम च्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी अखेर गेल्या ६ मार्च ला पालिका अर्थसंकल्पावर बोलताना आपली खंत बोलून दाखविली आणि विविध मागण्या मोठ्या खुबीने मांडल्या,नंतर कुठे नुकतेच त्यांना सत्ताधाऱ्यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील विद्युत वितरण समितीचे सभासद पद सत्ताधाऱ्यांकडून दिले गेले आहे . महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आपल्या सहीने कार्यालयीन आदेश काढला आहे . यानुसार विद्युत वितरण नियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समिती मध्ये १३ व्या क्रमांकावर एमआयएम च्या नगरसेविका लांडगे याचे नाव आल्याने शिवसेनेच्या भुवया उंचावल्या आहेत . या समितीत बापू कर्णे,अनिल टिंगरे ,शीतल सावंत,राहुल भंडारे,मारुती सांगडे, किरण जठार ,मुक्ता जगताप ,श्वेता गलांडे ,शीतल शिंदे,यांच्यानंतर अश्विनी लांडगे यांचे १३ वे नाव आहे. २६ मार्च रोजी आदेश काढण्यात आला असून या अन्वये एकूण १९ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे .
एमआयएम ला पालिकेत कार्यालय देणे, गटनेता म्हणून अधिकार मिळणे, अर्थ संकल्पात ओवेसी यांचा फोटो टाकणे अशा मागण्यांबाबत लांडगे या प्रयत्नशील असून तिथपर्यंत त्या कशा पद्धतीने पोहोचतील हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे .