पुणे- महापालिकेचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांना सुमारे १५ दिवसांपूर्वीच शासनाने सस्पेंड केल्याचे आज अखेरीस पालिकेच्या मुख्य सभेत स्पष्ट झाले . माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आज त्यांच्या निलंबनाची बाब उघड झाली . दरम्यान त्यांची शासनाने बदली केली होती मात्र पुण्यातील चांदणी चौकाच्या महत्वाच्या प्रकल्पासाठी आपण त्यांना थांबवून ठेवले होते .आणि त्यांची बदली काहीकाळ स्थगित करण्याची विनंती शासनाला केली होती. मात्र शासनाने त्यावर काही निर्णय घेतला नाही . आणि अखेर शासनाच्या आदेशाला न जुमानल्यामुळे त्यांचे निलंबन शासनाने केले असा खुलासा आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्य सभेत केला . यावेळी जर त्यांची पुण्याला गरज असल्यामुळे थांबवून ठेवले होते तर त्यांचे निलंबन मागे घ्यावे असे शासनाला कळवावे , तसा ठराव करावा असे वक्तव्य यावेळी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केले . यावर असे करायचे असेल तर कुणाल कुमार यांची हि बदली याच मार्गाने थांबवा असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावला .
यासंदर्भात आज …. पहा नेमके काय झाले मुख्य सभेत ….
उपायुक्त सतीश कुलकर्णी सस्पेंड -आज मुख्य सभेत पर्दाफाश
Date:

