पुणे- महापालिकेत मांडलेली पार्किंग पॉलीसी म्हणजे केवळ गरिबांचे गळे चिरण्याचे धंदे असून भाजपने ती तातडीने फेटाळून लावावी अन्यथा आंदोलन करून आम्ही ती हाणून पाडू असा इशारा आज मनसे च्या रुपाली पाटील यांनी येथे दिला .
अनेक भूखंडांवरील आरक्षणे उठविताना यांना अक्कल नव्हती काय ? तिथे वाहनतळे विकसित करता आली नसती काय ?आणि रात्री घरी झोपायला गेलेल्या , घराबाहेर गाडी , दुचाकी लावलेल्या , रिक्षा लावलेल्या माणसाला हि पार्किंग शुल्क द्यावे लागेल हा प्रकार म्हणजे सत्ता हाथी आली म्हणून केवळ गळे चिरायचे धंदे करण्याजोगा आहे …असा आरोप करत मनसेच्या रुपाली पाटील यांनी तातडीने अशी नालायक पॉलीसी फेटाळून लावा अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे … पहा आणि ऐका नेमेकं त्या काय म्हणाल्या ….