पुणे- ज्यांना पुण्यानं भरभरून दिलं, त्यांनींच पुण्याला लुटणारी ‘पार्किंग पॉलीसी ‘ तयार करून त्यावर मंथन सुरु ठेवणे म्हणजे … विपरीत बुद्धी चा हा प्रकार आहे ..परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो .. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी आज माय मराठी शी बोलताना व्यक्त केली .
पार्किंग पॉलीसी चा प्रस्ताव स्थायी समितीने दाखल करून घेतला आहे म्हणजे हेच चुकीचे आहे . अगोदरच २४ तास पाणीपुरवठ्याच्या नावाखाली पुण्याला कर्जाच्या खाईत लोटण्यात आलं आहे . आता गाडी घरी असो, वा दारी असो, म्हणजे बाहेर असो .. पार्किंग शुल्क तर द्यायचेच ..पुणेकरांना या जिझिया करातून वाचविण्यासाठी परमेश्वरानेच आता भाजपला सद्बुद्धी द्यावी असे ओसवाल यांनी म्हटले आहे … पहा आणि ऐका ओसवाल यांनी काय म्हटले आहे ..