पुणे- महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने एकाच उमेदवाराचा अधिकृत उमेदवारी अर्ज आज दुपारी महापालिकेत भरण्यात येणार असून ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चेअरमन पदाच्या उमेदवाराचे नाव शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना आणि गोगावले सभागृनेते श्रीनाथ भिमाले यांना कळवतील .गोगावले यावेळी येतील काय ? खासदार संजय काकडे उपस्थित असतील काय ? पक्षाचे कोण कोण नेते हा अर्ज भरताना असतील . याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे .तर विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रवादीच्या लाक्ष्मिताई दुधाने या उमेदवारी अर्ज दाखल करतील .
स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर, आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ योगेश मुळीक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री यापैकीच कोणाच्या पारड्यात चेअरमन पद टाकतील कि अन्य कोणाला संधी देतील ते आज समजेल अशी आशा आहे .
दुपारी येणार मुख्यमंत्र्याचा फोन -चेअरमन ठरणार आजच
Date:

