पुणे- कोथरूड मध्ये जिथे मेट्रो चे स्टेशन आहे तिथे शिवसृष्टी व्हावी … म्हणजेच शिवसृष्टी जिथे तिथे मेट्रो … अशा स्वरूपाचे कित्येक वर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार काय ? या प्रश्नाचे उत्तर आता बहुधा अंतिम टप्प्यात आले असावे . हे स्वप्न पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पाहिलेले..आणि अजूनही त्याच स्वप्नासाठी सातत्याने संघर्ष त्यांनी सुरु ठेवला आहे . दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील मंत्रालयात याच भूमिकेवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महापालिकेतील गटनेत्यांची बैठक होते आहे .
गेली कित्येक महिने हा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही सातत्याने त्याकडे डोळेझाक झाल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे .दीपक मानकर यांचे म्हणणे आहे , त्याप्रमाणे तिथेच मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी या दोन्ही गोष्टी शक्य असल्याचे आजवर मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह सर्वांनी मान्य केलेले आहे . पण याबाबत ठोस भूमिका का घेतली गेली नाही ? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही पुणेकरांना किंवा शिवप्रेमींना मिळालेले नाही . मुख्यमंत्र्यांनी अखेर पुण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाला मान्यता देवून या विषयावर निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे .
येत्या ९ तारखेला शिवसृष्टी या विषयावर महापालिकेची 5 वि खास सभा आहे . तत्पूर्वी ,मंगळवारी 6 तारखेला होणाऱ्या बैठकीत खरे तर अंतिम निर्णयच अपेक्षित आहे . मुख्यमंत्र्यांचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा देखील …
या पार्श्वभूमीवर तमाम शिवप्रेमी आणि पुण्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेकांचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय होतंय याकडे लक्ष लागून आहे .