|
- मुरलीधर मोहोळ ( भाजप, स्थायी समिती अध्यक्ष)
- हरिदास चरवड ( भाजप)
- योगेश समेळ ( भाजप)
- बॉबी टिंगरे ( भाजप)
- नाना भानगिरे ( शिवसेना )
- रेखा टिंगरे ( राष्ट्रवादी)
- प्रिया गदादे ( राष्ट्रवादी)
- अविनाश बागवे ( काँग्रेस)
- भाजप : 4
- राष्ट्रवादी : 2
- काँग्रेस : 1
- शिवसेना : 1
पुणे: महापालिका निवडणुकीनंतर स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने समिती मधील आठ सदस्य आज चिट्ठी द्वारे बाहेर पडले.मातब्बर आणि अभ्यासू असा लौकिक असलेल्या अविनाश बागवे आणि मुरलीधर मोहोळ यांचा यात समवेश झाल्याने भाजपा सह कॉंग्रेसला धक्का बसला आहे . यात भाजपचे सर्वाधिक 4 सदस्य बाहेर पडले असून त्यात स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.समिती सदस्य पदाचा कार्यकाळ 2 वर्षांचा असल्याने निवडणुकी नंतर समितीचा पहिले वर्ष पूर्ण होताच 8 सदस्य बाहेर पडतात. आज काढण्यात आलेल्या चिठ्या मध्ये भाजपचे 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे 2सदस्य शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक असे या चिठ्या मध्ये नाव आल्याने बाहेर पडला .
स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी अर्धे म्हणजेच आठ सदस्यांचा कार्यकाळ दरवर्षी संपुष्टात येतो. चिठ्ठीद्वारे ही नावे काढली जातात. ज्या पक्षांच्या सदस्यांची नावे येतात तेथे त्याच पक्षातील अन्य सदस्यांची निवड केली जाते. सध्या पक्षीय बलाबल प्रमाणे स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य यांचा समावेश आहे. फेब्रुवारीतील मुख्यसभेत ही आठ नावे समितीला मुख्यसभेकडे सादर करावी लागणार आहेत. त्याआधी चिठ्ठी काढणे आणि पक्षाद्वारे नव्या सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.