पुणे- महापालिकेत नौकरीवर नसताना ,नियुक्तीपत्र नसताना ,आय कार्ड नसताना ७८ बोगस कर्मचारी कार्यरत असल्याच्या वृत्ताला खाजगीत दुजोरा देत या बोगस कर्मचाऱ्यांवर आगामी काळात कायदेशीर कारवाई होईलच असे स्पष्ट संकेत महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी मायमराठी शी बोलताना दिले आहेत .
महापालिकेतील काही ‘म्हातारे’ संगणकीय कामकाज न करता अशा प्रकारे बोगस कर्मचारी पाळत असून या सर्वांचा गोपनीय अहवाल तयार करण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे महापालिकेचे कामकाज ठप्प होऊ नये म्हणून लवकरच वृत्तपत्रात जाहिरात देवून आपण नौकर भरती करू तत्पूर्वी सर्व बोगस कर्मचारी बाहेर काढू असे हि स्पष्ट त्यांनी केले आहे .

