पुणे-जिथे येतात रुबाबदार आणि जोरात पावले,जिथे होते हजारांपासून ते अब्जावधींच्या विकासकामांच्या फायलींची वर्दळ ,जिथे होतो राजकीय कुरघोड्यांचा आखाडा ..आंदोलनांचा गदारोळ … कार्यकर्त्यांचा आणि भल्याभल्या राजकारण्यांचा असतो जिथे राबता … अशा सर्व गदारोळात ..प्रत्येकाला पाणी ,चहा देण्यासाठी , फायलींची ने आण करण्यासाठी अगदी निस्पृह पणे काही हाथ सदैव राबताना पाहिलंय अनेकांनी .. अशा तब्बल ३२ वर्षे राबणारे काही निस्पृह हाथ आज सेवेतून निवृत्त झाले .
‘निवृत्ती’चा हा गहिवर कदाचित नेहमीच राजकीय वर्दळीत अलगद विरून जातो .
असाच गहिवर आज याच कार्यालयात पुन्हा एकवार दिसून आला .
पुणे महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयातील सेवक भास्कर जाधव आणि सुरेश भोसले आज सेवेतून निवृत्त झाले . त्यांची पावले आज महापालिकेतून बाहेर पडताना निश्चितच जड होत होती …निवृत्तीचा हा गहिवर तसा नेहमीच दिसतो अन पुन्हा राजकीय वर्दळीत विरून जातो .
.त्यांच्या दीर्घकालीन सेवेला सलाम करीत त्यांचे निवृत्तीनंतरचे भावी आयुष्य देखील अशाच कुठल्या तरी चांगल्या सेवेत रममाण होवो ..अशीच इछ्या यावेळी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त करीत त्यांचा गौरव केला . त्यांच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा छोटेखानी समारंभ नगरसचिव कार्यालयात 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे .
गहिवरते कधी… कधी …नगरसचिव कार्यालय …
Date:

