पुणे-महापालिका निवडणुकीसाठी आणि मतदाराला आकर्षित करण्यासाठी अनेक नानाविध कल्पना राबविल्या गेल्या , या पूर्वी कोणी वाटरपार्कच्या सहली केल्या , कोणी अन्य रम्य स्थळी सहली नेल्या , कोणी देवदर्शन घडविले .. हळदी कुंकू ,होम मिनिस्टर मधून मूल्यवान गृहपयोगी उपकरणांची खैरात केली.
आता मात्र पेड कार्यकर्ते ,पेड पब्लिसिटी आणि प्रचार यात्रांचा धडाका लावावा लागतो आहे . हे करताना आपल्या प्रचार यात्रेकडे लोक आकर्षित व्हावेत म्हणून अनेकांनी फिल्मी चेहरे आणायला सुरुवात केली आहे . तासभर साठी किमान 3 लाखापासून १५ लाखापर्यंतचे मानधन या साठी मराठीतील फिल्मी चेहरे पुरविणाऱ्या एजटांनी दर निश्चिती केली असून, हे सारे व्यवहार काळ्या मार्गानेच होऊ शकणार आहे , हिंदीतील चेहऱ्यांना १५ लाखापासून पुढे ४० लाखापर्यंतचे दर सांगितले जात आहेत . पण बहुधा साऱ्यांना छोट्या पडद्यावरील कलाकार फेरीत सहभागी व्हावेत असे वाटते आहे . त्यासाठी हि किमान 3 लाखापासून ते १० लाखापर्यंत मानधन सांगितले जाते आहे .