पुणे-
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आलेल्या 2 हजार 665 अर्जांची छाननी सुमारे ३०० अर्ज बाद ठरले . याबाबत प्रत्येक ठिकाणी महापालिका कार्यालयात निवडणूक यंत्रणा आणि पोलीस यांच्यात गोंधळ उडाल्याने , राज्यात सत्तेवर आहे त्याला संधी , त्याच्या अधिपत्याखाली .. आणि विरोधी आहे, त्याला हमरी तुमरी … त्याच्यावर करडी नजर ..कुठे घावतो तिथे पाहतो .. असे धोरण राबविले गेल्याने छाननीच्या दिवशीच कॉंग्रेस राष्ट्रवादी सह भाजप वगळता अन्य पक्षांची गोची होत गेली कित्येक ठिकाणी अधिकारी आणि पोलीस यांनी या पक्षाच्या नेत्यांनाही जुमानायचे नाही असे धोरण ठेवले , रात्री १२ वाजून गेले तरी छाननी आणि छाननीचे राजकारण सुरूच होते .यामुळे पीआरओ आणि वरिष्ठ अधिकारी मिडीयाला स्पष्ट पणे नेमकी अचूक माहिती देऊ शकले नाहीत .
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी शहराध्यक्ष रमेश बागवे सह अभय छाजेड यांना आत जाण्यास परवानगी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यानी संतप्त प्रतिक्रिया दिली. नगरसेविका हिना मोनीन यांचे चिरंजीव आतिक मोमीन यांना पोलिसांनी ओळखपत्र नसल्याने आत जाऊ दिले नाही. नगरसेवक अविनाश बागवे यांच्यावर मनसे चे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी हरकत घेतली होती त्यावेळेस रमेश बागवे अर्जाची छाननी पाहण्यासाठी कार्यालयात जात असताना मोमीन यांनी पाहिले. त्यावेळेस मोमीन यांनी पोलिसांना मला आत जाऊ दिले नाही तर बागवे यांना कसे काय आत सोडताय असा सवाल पोलिसांना केल्यावर पोलिसांनी बागवे यांना ही बाहेर काढले.त्यानंतर रात्री उशिरा समाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांना मात्र बिनदिक्कतपणे आत जाताना पाहून काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे सह कार्यकर्त्यानी पोलिसांबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली.यावेळी कांबळे यांनाही बाहेर काढा असे सांगत पोलिसांबरोबर कार्यकर्त्याची वादावादी झाली..
दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील निवडणूक यंत्रणा भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. निवडणूक यंत्रणेने सगळ्यांना मदत केली पाहिजे. मात्र, निवडणूक यंत्रणेकडून सर्वसामान्य नागरिकांना अडविण्यात येत आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत असल्याचा आरोप, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला.
पिंपरी येथे साठे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगरसेविका सुजाता टेकवडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, अॅड. नरेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.