Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोणी करीत नाही वाकडे ..जिथे आहेत काकडे .. भाजपची पुण्यात विजयी घौड दौड

Date:

पुणे-:पुण्यात एकाकी लढत देणाऱ्या भाजपची विजयाकडे घौड दौड  सुरु आहे .भाजपा कार्यकर्त्यात एकाच जल्लोष सुरु आहे . या सर्व विजयाचे श्रेय खासदार संजय काकडे तसेच पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना मिळाले आहे . हेच पुण्याचे कारभारी ठरले आहेत  ७७ जागांवर आतापर्यंत भाजप तर ४४ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे ,कॉंग्रेस  १६,शिवसेना १० अशी विजयाची आकडेवारी प्राप्त झाली आहे . तर मनसे ५ आणि इतर ५ अशी आघाडी उमेदवारांनी घेतली आहे . अनेक निकाल जाहीर झाले आहेत तर अजूनही निकाल हाती येत आहेत . कॉंग्रेसचे अविनाश बागवे ,अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे दीपक मानकर ,प्रशांत जगताप   ,दत्ता धनकवडे, प्रकाश कदम, विशाल तांबे , किशोर धनकवडे , अश्विनी सागर भागवत  विजयी झाले आहेत . पुण्याचे उपमहापौर मुकारी अलगुडे व स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेवक राजु पवार अशा तिन विद्यामनाना पराभूत करून खासदार अनिल शिरोळेंचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे विजयी झाला आहे .जिथे नेता आहे अशा पक्षाला विजयाकडे खेचणारी अशी  हि निवडणूक ठरली आहे .राष्ट्रवादीला आपला गड राखता आलेला नसला तरी राष्ट्रवादीचे  प्रमुख उमेदवार मात्र विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत .

वडगावशेरी मतदारसंघात ८ जागांचे निकाल जाहीर. त्यापैकी ७ जागा भाजप आणि एका जागेवर राष्ट्रवादी विजयी.

: पुणे प्रभाग क्र. २१ मध्ये रिपाइं- भाजपचे नवनाथ कांबळे  विजयी

: प्रभाग क्रमांक ३८ अ मधील माजी महापौर दत्तात्रय धनकवडे विजयी

: प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपचे श्रीनाथ भिमाले १८ हजार ३५६ मते घेऊन विजयी

प्रभाग क्रमांक सातमध्ये चारही ठिकाणी भाजप आघाडीवर

: प्रभाग क्रमांक २० अ राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड ५०३७ मतांनी विजयी
२० ब- काँग्रेसच्या चांदबी नदाफ १९८५ मतांनी विजयी
२० क- काँग्रेसच्या लता राजगुरू ३३७२ मतांनी विजयी
२० ड- काँग्रेसचे अरविंद शिंदे ५२०८ मतांनी विजयी

प्रभाग क्र. १५ भाजपचे पॅनल विजयी

अ गट (भाजप ) हेमंत रासने
क गट (भाजप)मुक्ता टीळक
ब गच (भाजप)गायत्रि खडके
ङ गट (भाजप)राजेश येनपुरे

प्रभाग क्रमांक १९

विजयी उमेदवार

अ अविनाश बागवे – काँग्रेस
ब मनिषा लडकत -भाजप
क अर्चना पाटील -भाजप
ड रफिक अब्दुल शेख -काँग्रेस

प्रभाग क्र.२१ घोरपडी – कोरेगाव पार्क
भाजप आरपीआयचे अ गटातील उमेदवार नवनाथ कांबळे यांना १३२६८ मते मिळाली त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे प्रशांत म्हस्के यांचा ५६७५ मतांनी पराभव केला.
ब गटातील भाजप चे उमेदवार लता धायरकर ११८३० मते मिळाली त्यांनी मनसेच्या मनीषा ससाणे यांचा ४४६८ मतांनी पराभव केला.
क गटातील भाजप उमेदवार मंगला प्रकाश मंत्री यांना 9657 मते मिळाली त्यांनी मनसेच्या विद्यमान नगरसेविका वनिता बाबू वागस्कर यांचा २४० मतांनी पराभव केला.
ड गटातील भाजपचे उमेदवार उमेश गायकवाड यांना १०१३६ मते मिळाली त्यांनी प्रतिस्पर्धी मनसे चे विद्यमान नगरसेवक बाबू वागस्कर यांचा ४४२ मतांनी पराभव केला.

प्रभाग 2 – फुलेनगर – नागपुर चाळ – भाजपचे डॉ.सिद्धार्थ धेंडे, अॅड.फरजाना शेख, शीतल सावंत आणि रा.कॉ.चे सुनील टिंगरे विजयी झाले आहेत .

प्रभाग 37 अ वर्षा साठे भाजप तसेच
ब रूपाली धाडवे बीजेपी विजयी
बाळसाहेब ओसवाल सेना विजयी झाले आहेत .

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार प्रशांत जगताप
राष्ट्रवादीचे विजय उमेदवार प्रकाश कदम

प्रभाग ३९ -किशोर धनकवडे, विशाल तांबे, अश्विनी भागवत तीनही राष्ट्रवादीचे तर भाजपाच्या वर्षा तापकीरविजयी झाल्या आहेत .

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी...

बावधनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान...

संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय,...

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर अंतिम फेरीसाठीदेशभरातील २४ संघांचा सहभाग पुणे: एमआयटी...