पुणे-महापालिका निवडणुकीसाठी दक्षिण पुण्यातून ‘पुणे विकास आघाडी ‘ निर्माण होते आहे . भाजप, सेना , मनसे,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सह सर्व राजकीय पक्षांना तिलांजली देवून प्रभाग क्रमांक ३८ ,३९,४०,४१ या पराभागातून १६ उमेदवारांच्या माध्यमातून ……. पुणे विकास आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत . महापालिका निवडणुकीसाठी अनेक वर्षांपूर्वी नागरी संघटना हि राजकीय पक्षविरहित संघटना पालिकेची निवडणूक लढली आणि सत्ता हि काबीज केली होती . नानासाहेब परुळेकर ,नरुभाऊ लिमये , शांताराम दिवेकर ,ना. तू . पवार आदी मान्यवरांनी हा प्रयत्न यशस्वी केला होता. त्यानंतर सुरेश कलमाडी यांनी पुणे विकास आघाडी निर्माण केली आणि महापालिकेत सत्ता मिळविली होती .आता होवू घातलेल्या या नव्या आघाडीचे नाव ‘पुणे विकास आघाडी ‘ च असेल कि अन्य कोणते असू शकेल यावर हि खल होतो आहे .
आता सध्याच्या महापालिका निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असताना … पुणे विकास आघाडी चा बिगुल दक्षिण पुण्यातून वाजू पाहतो आहे. परंतु यामागे नेमकी कोणती विचारधारा आहे, कोण कोण लोक आहेत हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आले नाही , पालिका निवडणुकीसाठी अत्यंत थोडा कालावधी राहिला असताना असा प्रयत्न यशस्वी होईल काय ? हे अर्थातच याबाबत प्रयत्न सुरु करणाऱ्या संबधीतांवरच अवलंबून आहे .विशेष म्हणजे ज्या भागातून सरकारी जमिनी बळकावणे त्यावर बेकायदा बांधकामे करून करोडोची माया कमवून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे अशा माध्यमातून बहुतांशी राजकारण होत आले त्याच भागातून अशा आघाडीचा प्रयत्न सुरु होणे हे कौतुकास्पद मानले जाईल .