पुणे – महापालिकेवर एकमेव भाजपचाच झेंडा फडकणार .. या स्वप्नरंजनात रमलेल्या काहींनी सत्ता येण्यापुर्वीच भाजपमध्ये शहर नेतृत्वाचा वाद पेटविला आहे . त्याचा परिणाम म्हणून आता यापुढे पक्षाला आयारामांबद्दल निर्णय घेताना मोठ्या दिक्कतींचा सामना करावा लागणार आहे . आणि दुसरीकडे त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे .
शहरात भाजपचे २ खासदार आहेत आणि आठ आमदार आहेत, त्यातले २ मंत्री आहेत , एकमेव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा लढलेल्या भाजपकडे इथे शहरात मात्र एकखांबी नेतृत्व दिसत नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून काही नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून नेतृत्वाचा वाद एवढा पराकोटीला गेला आहे कि आता आम्हाला विचारल्याशिवाय कोणाला भाजपमध्ये घेवू नका अशी भूमिका काहींनी मांडली आहे . यामुळे भाजप मध्ये जाणाऱ्यांना देखील अनेकदा विचार करावा लागणार आहे . हा वाद अर्थात जेवढा पेटेल तेवढा त्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा होईल असाही जाणकारांचा अंदाज आहे .
दरम्यान या प्रकरणावरून खालच्या फळीतील भाजपचे सामान्य कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत , ज्यांना यायचे आहे आणि ज्यांच्यामुळे पक्षाला कार्यकर्त्याला बळ मिळणार आहे त्यांना ..केवळ आम्ही इथले राजे .. असे म्हणत रोखणे म्हणजे संघटनेचे नुकसान करवून घेणे आहे असे म्हणणे ते मांडत आहेत . पुण्याचे तथाकथित माजी खासदार आणि नेते सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाचा अस्त झाल्यानंतर , कलमाडींकडे असलेली कार्यकर्ता सांभाळण्याची (दुर्दम्य?) शक्ती आजवर कोणी दाखविली नसल्याने पुण्याला एकखांबी खंबीर नेतृत्व मिळालेले नाही .नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने सोशल मिडिया आणि अन्य प्रचाराच्या बाबींचे नियोजनपूर्वक केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळविली .त्याचा अभ्यास स्थानिक नेत्यांनी करणे गरजेचे आहे असे कार्यकर्ते देखील बोलत आहेत . आता मोदींच्या नावाने महापालिकेतही आपल्यालाच सत्ता मिळेल या भ्रमात मात्र राहू नये असे याच पक्षातील जाणकारांचे मत आहे, पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला.. म्हणून मला नगरसेवक करा.. असे म्हणणे मार्च २०१७ मध्ये चालणार नाही .उलट त्यावेळी शहराचे मुलभूत प्रश्न आणि महागाई ,बेरोजगारी या समस्या ऐरणीवर येतील. त्यामुळे महापालिका जिंकायची असेल तर कॉंग्रेसचीच किंवा कलमाडी यांचीच व्युहरचना अवलंबवावी लागेल असे हि सांगण्यात येत आहे . मराठा समाजाने पेटविलेले रान पाहता कधी काळी ..त्या काळात कलमाडीसारख्या अमराठी नेतृत्वाशी विरोधी पक्षात राहूनही सौख्य ठेवणाऱ्यांनी तर आता मुळीच जातीयवादी भूमिका घेवू नये आणि हा जुना तो नवा असा वाद हि उफाळून आणण्याचा प्रयत्न करू नये असे बोलले जाते आहे . कार्यकर्त्यांना त्यांची कामे करणारा नेता हवा असतो निव्वळ गुळमुळीत बोलून वाटी लावणारे नेते नको असतात . सत्तेतून दूर गेलेल्या काँग्रेस ने आता सुधारणावादी धोरण स्वीकारले आहे म्हणूनच ते आमच्या कडे इनकमिंग फ्री आहे असे म्हणत आहेत . यावरून ते सुधारले… पण आता तुम्ही ( भाजप नेते ) बिघडू नका असे आवाहनही केले जात आहे .