पुणे-महापालिकेच्या मुख्य सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, सभागृहनेते आणि कॉंग्रेसचे गटनेते यांनी एकमेकांविरोधात बदनामीच्या तक्रारी केल्या . पोलीस आणि न्यायालय इथपर्यंत त्या पोहोचल्या असे असताना आता नवे तरुण नगरसेवक दीपक पोटे आणि सुशील मेंगडे यांनी अरविंद शिंदेंवर आरोप करत त्यंच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे .
भा.ज.यु.मो,पुणे शहर अध्यक्ष असलेले नगरसेवक दिपक पोटे , युवा मोर्चा सरचिटणीस असलेले आणि महापालिकेतील शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष असलेले नगरसेवक सुशील मेंगडे तसेच संपर्कप्रमुख प्रतीक देसरडा यांच्या नेतृत्वाखाली भा.ज.यु.मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापौर सौ.मुक्ता टिळक यांना या संदर्भात निवेदन दिले आहे .काँग्रेस चे पुणे महानगरपालिकेतील गटनेते अरविंद तुकाराम शिंदे गेले अनेक वर्ष नगरसेवक असून काँग्रेस – राष्ट्रवादी ची सत्ता गेल्या नंतर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यावर सर्वसाधारण सभेच्या वेळी सभागृहात सातत्याने अडथळे निर्माण करत आहेत . सातत्याने बेताल वक्तव्य करत सभागृहातील वातावरण गढूळ करत आहेत व सभागृहातील कामकाज बंद पाडत आहे . भारतीय जनता पार्टी च्या वरीष्ठ नेत्यांची , पदाधिकाऱ्यांची , पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते यांची बदनामी करण्याचा सपाटा त्यांनी लावला .श्री.शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेचे सभागृहातील सभांमध्ये असाच अडथळा सुरू ठेवला तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात येईल .असे या निवेदनात म्हटले आहे .
यावेळी भा.ज.यु.मो,पुणे शहराचे पदाधिकारी राजू परदेशी , सुनील मिश्रा, कुणाल चौगुले, किरण ओरसे , बाबू खैर , शाम काची , शशांक सुर्वे , यश सुरती आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


