पुणे – महानगरपालिकेवर भाजपने एकहाती सत्तेचा झेंडा फडकविल्यानंतर आता महापौर, उपमहापौर ,स्थायीसामिती अध्यक्ष अशा पदांच्या शर्यतींना तातडीने प्रारंभ झाला असून मुक्ता टिळक आणि रेश्मा भोसले, वर्षा तापकीर महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट झाले आहे
प्रभाग १५ मधील मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यानंतर सदाशिव पेठेमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथील जनतेने भाजपला कौल दिला. भाजपचे संपूर्ण पॅनल या ठिकाणी निवडून आले आहे.
निकाल लागल्यानंतर अनेकाच्या भुवया उंचावल्या. प्रभागातील भाजपचेच पॅनल निवडून आले. अ – हेमंत रासने, ब – गायत्री खडके सूर्यवंशी, क – मुक्ता टिळक, ड – राजेश येनपुरे हे निवडून आलेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत. मुक्ता टिळक यांना पुणेरी पगडी घालून त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. भाजपकडून महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड करण्यात आल्याची माहिती काहीजणांकडून सांगण्यात येत आहे.