पुणे : महापालिका आयुक्तांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे ५ हजार ३९७ कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात स्थायी समितीने त्यात ४७३ कोटींनी वाढ करत ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, चालू वर्षांत महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यामुळे २०१९-२० या वर्षाचे अंदाजपत्रक ६ हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा पार करणार का याबाबत उत्सुकता होती. मात्र आयुक्तांनी ५ हजार ८५ कोटींचे अंदाजपत्रक करीत हा टप्पा पार केला आहे.
आयुक्तांच्या बजेटमधील नवीन प्रकल्प व योजना :
*पालिकेच्या प्रकल्पांचे व योजनांचे त्रयस्त संस्थेमार्फत अवलोकन करण्याबरोबरच सामाजिक संस्थाकडूनही केले जाणार अवलोकन
*कामाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी सामाजिक व परिणामकारक अवलोकन करण्यावर भर
*एचसीएमटीआर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार
*पीएमपीएमएल ताफ्यात ई- बस, सीएनजी व वातानुकूलीत बसचा समावेश होणार
*मेट्रो, प्रधानमंत्री आवास योजना, समान पाणीपुरवठा योजना, जायका प्रकल्प पूर्ण करण्यास विशेष प्रयत्न
*पालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसाठी पुरेशा निधीची तरतूद
पालिकेचे ३० टक्के उत्पन्न वाढीसाठी पुढील गोष्टींवर भर :
* समाविष्ट गावामधील मिळकतींना मिळकत कर लावणे
*मिळकतकर न लावलेल्या शहरातील मिळकतींचा शोध घेऊन या मिळकतींना कर लावणे
*अनधिकृत इमारतींमधील घरांना एक पट दराने कर आकारणी केली जाणार असल्याने कर भरणाऱ्यांची संख्या वाढणार
*थकीत पाणीपट्टी वसूल करण्यावर भर
*पालिकेच्या मालकीच्या मिळकतींचा जास्तीत जास्त वापर
*आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधुनिकीकरण करून उत्पन्न वाढवणे
– जाहिराती मधून 111 कोटीचे उत्पन्न अपेक्षित
– अंधांसाठी ऑडियो लायब्ररी
– शिक्षकांचे वेतन पहिल्यांदाच संगणकीकरणाद्वारे देणार
– शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब आणि संगीत वर्ग
– शिक्षण मंडळ 329 कोटी तरतूद. 5 नवीन मॉडेल स्कुल सीएसआर आणि महापालिका करणार
– शिवसृष्टीसाठी प्रयत्न करणार
– बाणेर येथे आर. के लक्ष्मण कलादालन
– घोले रस्ता येथे पहिली सिटी लायब्ररी. दृक-श्राव्य स्वरुपात पुस्तके उपलब्ध होणार
– व्यवसायिक प्रशिक्षणासाठी 7 नवीन लाईट हाऊस उभारणार
– स्मार्ट सिटीसाठी 50 कोटी
– पालिकेच्या 34 इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प
– कोथरूड भागात ‘बोलणारी झाडे’ प्रकल्प
– तुकाई माता उद्यानात लिली आणि रॉक पार्क
– सुगम्य भारत योजने अंतर्गत उद्यानात विशेष सुविधा
– 2019-20 मध्ये पहिले घर वाटप करण्याचे उद्दिष्ट
– आवास योजनेत 21 हजार घरे बांधणार
– 23 गावात लोकल एरिया प्लॅन राबविणार. लोकल एरिया प्लॅनसाठी केंद्रकडून मिळणार अनुदान
– 11 गावातील बांधकामे अधिकृत करणार
– 11 गावाचा ईएलयु जाहीर करणार
– 11 गावात नवीन टीपी स्कीम राबविणार
– महापालिका उभारणार बर्न वॉर्ड
– आणखी 3 ठिकाणी डायलिसीस सुविधा देणार
– आरोग्य विभाग 246 कोटी
– प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र ऑनलाईन डॅशबोर्ड करणार
– नागरिकांची मते, तक्रारींसाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करणार
– सिंहगड रस्ता धायरीला वाय आकाराचा पूल
– औंध सांगावी रस्त्यावर नवा आणखी एक पूल
– राजाराम पूल येथे आर्ट प्लाझा
– हडपसर आणि रामटेकडी येथे भुयारी मार्ग. बोपोडी चौकात भुयारी मार्ग
– वडगाव शेरी येथील नवीन पार्किंग तळ विकसित करणार
– 12 जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार
– 100 किलोमीटरचे रस्ते पाहिल्या टप्प्यात सुरक्षित करणार
– 1400 किलोमीटर रस्त्याचे रोड असेंट मॅनेजमेंट सिस्टम नुसार रस्त्याचा बदल करणार
– 100 किलोमीटर रस्त्यावर स्मार्ट स्ट्रीट करणार
– 1 जानेवारी 2020 पासून उरुळी देवाची यातील कचरा डेपो बंद करणार
– एचसीएमटीआर रस्ता 211 कोटी रुपयांची तरतूद
– असा होणार 2019-20 चा खर्च
* सेवकवर्ग 1665 कोटी
* कर्ज- व्याज परतफेड 78 कोटी
* वीज, देखभाल दुरुस्ती 255 कोटी
* पाणी खर्च 170 कोटी
* इतर खर्च 1095 कोटी
* औषध – घसारा 200 कोटी
* प्रभागस्तरीय- 34 कोटी
* क्षेत्रीय कार्यालय 82 कोटी
* भांडवली कामे 1843 कोटी
* पाणी पुरवठा प्रकल्प 707 कोटी
– असे येणार 6085 कोटीचे उत्पन्न
* एलबीटी अनुदान 200 कोटी
* जीएसटी अनुदान 1808 कोटी
* मिळकतकर 1721 कोटी
* पाणीपट्टी 450 कोटी
* अनुदान 239 कोटी
* बांधकाम शुल्क 750 कोटी
* कर्ज रोखे 200 कोटी
* इतर 602 कोटी
– पीएमपीसाठी 375 कोटी तरतूद
– 200 कोटीचे नवे कर्ज रोखे घेणार
– नदी सुधारणासाठी 80 कोटी
– उत्पन्नात 30 टक्के वाढ करणार
– नवीन कर आकारणी मिळकती वाढविणार
– कर रचना बदलणार

